पान:फुलाचा प्रयोग.djvu/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " मी भित्रा नाही. हा बघ पितो. "
 माधवने पेला रिकामा केला. भुते निघून गेली. माधवाची चर्या आनंदी झाली. तो रंगेल दिसू लागला. जणू नाचरे फुलपाखरू.
 " सैताना. चल लौकर, कोठे तरी गमतीच्या ठिकाणी ने. " माधव म्हणाला.
 " मग डोळे मीट. मीट डोळे. " सैतान हसून म्हणाला.
 त्याने डोळे मिटले. कोठे तरी ते जात होते. “ उघड़ डोळे, " सैतान म्हणाला. माधवाने डोळे उघडले. ते मर्त्यलोकींच्या एका शहरात उतरले होते.










प्रेमाचा पेला ६७