तर हे काहीच दिसत नाही. तू हसतोस, आनंदात असतोस. "एका विद्यार्थ्यांने सांगितले.
"परंतु मी हसणाऱ्या सृष्टीतच क्रांती करणार आहे. समाजातील -गरिबांच्या मुलांची तोंडे टवटवीत करण्याची क्रांती तुम्ही करा. तुम्ही गरिबांचे संसार सुखाचे करा. धुळीत पडलेल्यांचा उद्धार करा. शेतकऱ्या- - कामकऱ्याची मान उंच करा. श्रमणाऱ्यांची प्रतिष्ठा वाढवा. ते काम माझे नाही. मी फुलांच्या सृष्टीत क्रांती करणार आहे. एकेका फुलावर दहा दहा रंग फुलवणार आहे. ह्या झाडाचे त्यावर कलम, त्याचे ह्यावर कलम. रानातील फुले आणून त्यांचा मी विकास करीन. निरनिराळे शोध लावीन. गंधाची व रंगाची जी ही पुष्पसृष्टी, तिच्यात मी वावरेन. तुम्ही मानव जात सुखी करा. त्या सुखी मानव जातीच्या भोवती मी फुलबाग वाढवीन. घाणेरीची फुले मोगऱ्याची करीन. टाकाऊ फुलांत गंध आणीन. सुंदर नसणाऱ्या फुलांना सुंदर करीन, हे माझे काम. ह्यासाठी माझे हात, ह्यासाठी माझे डोळे, ह्यासाठी माझा अभ्यास, ह्यासाठी माझे ज्ञान, ह्यासाठी माझे घरदार, माझी सारी संपत्ती. माझ्या डोळ्यांसमोर जागेपणी व झोपेतही फुलेच फुले हसत असतात. मग मी हसू नको तर काय करू ? ' फुला आपले हृदय उघडे करून सांगे.
असे ते शिकण्याचे दिवस गेले. फुला आपले शिक्षण संपवून स्वतःच्या गावी राहू लागला. त्याला एक आत्या होती. आणखी कोणी नव्हते. ती आत्या फुलावर जीव की प्राण प्रेम करी. तो आता म्हातारी झाली होती.
"फुला, आता लग्न कर. माझ्या डोळ्यांनी तुझी बायको बघू दे. एके दिवशी आत्या म्हणाली.
"मला नाही लग्न करायचे. माझे लग्न फुलांशी. " तो म्हणाला.
"बगीच्यात फुले हवीत. घरात मुले हवीत. " आत्या हसून म्हणाली.
"काही तरीच तुझे दुसरे काही बोलत जा. लग्नाचे नको बोलू. - नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही बघ. " फुला फुरंगटून म्हणाला.
"बरे हो. नाही काढणार पुन्हा लग्नाची गोष्ट. तुला ज्यात सुख त्यातच मला, तुझ्यांसाठी तर मी जगल्ये आहे. " आत्या म्हणाली.
१२ * फुलाचा प्रयोग
पान:फुलाचा प्रयोग.djvu/६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे