पान:फुलाचा प्रयोग.djvu/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फु ला
********** *

त्याचे नाव होते फुला. फुलांचे त्याला

वेड. त्याचे वय फार नव्हते. पंचवीस-

तीस वर्षांचे असेल. फुलाने लग्न केले

नव्हते. त्याने आपले लग्न फुलझाडांशी लावले होते. तो शिकला होता.. शास्त्रांचा त्याने अभ्यास केला होता. विशेषतः वनस्पतिशास्त्राचा त्याने अभ्यास केला होता. त्यातल्या त्यात पुन्हा फुलांच्या सृष्टीचा अभ्यास म्हणजे त्याचा आनंद.
 तो शिकत असताना त्याचे अनेक मित्र होते. फुलाला फुलांचे वेड असे व मुलांना फुलांचे वेड असे. फुलाचा चेहरा फुलाप्रमाणेच टवटवीत व सुंदर होता. फुलांची सारी कोमलता व मधुरता जणू त्याच्या तोंडावर फुलली होती. त्योचे डोळे कमळाप्रमाणे होते. कपाळ रुंद होते. नाक सरळ पण जरा बाकलेले असे होते. तो उंच होता, परंतु स्थूल नव्हता. त्याची उंची त्याला खुलून दिसे.
 "फुला, तूं क्रांतीत भाग घेणार की नाही ? " त्याचे मित्र त्याला विचारीत.
 " हो, घेणार आहे ! " तो हसत म्हणे.
 " क्रांतीत भाग घेणारा हसत नाही ! " कोणी म्हणे.
 " क्रांतिकारक का रडतो ? " फुला पुन्हा हसून विचारी.
 " क्रांतिकारक रडत नाही. तो रडवणाऱ्यांना रडवतो. तो निश्चयी असतो, गंभीर असतो. त्याच्या जीवनात एक प्रकारचो प्रखरता असते. गुलगुलीत व लुसलुशीत असे त्याच्या जीवनात नसते. तुझ्या ठिकाणी

फुला ११