पान:फुलाचा प्रयोग.djvu/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रे मा चा पे ला

        • * * * * * * *

“ उघड डोळे, " सैतान म्हणाला. माधवने डोळे उघडले. कोठे आले होते. ते ? तेथे एक मोठा दिवाणखाना होता. तेथे खाणे-पिणे चालले होते. मोठी मेजवानी होती. कोणी लाडू खात होता, कोणी जिलेबी खात होते; कोणी चिवड्यावर हात मारला, तर कोणी भज्यांवर खूष होते. कोणी फळांचे भोक्ते होते, ते द्राक्षांच्या घडांवर तुटून पडत होते. काहींना संत्री मोसंबी आवडली. हे काय ? एकदम अंधारसा झाला ? सैतानाने गंमत केली. दिवे विझले. लोक एकमेकांच्या हातांतील ओढू लागले. कोणाला काही दिसेना. द्राक्षे म्हणून ओढायला जात, तो कोणाच्या तोंडाला हात लागे. फजिती झाली. पुन्हा प्रकाश पडला. सारे हसू लागले. पुन्हा खाण्यावर घसरले. आता कोणी मद्याकडे वळल. दारूचे पेले रिकामे होऊ लागले. दारू पिऊन प्रेमाला भरती आली. एकमेकांच्या गळ्यांत पडू लागले. “ तू अगदी माझा. अगदी माझा. " असे म्हणू लागले. परंतु प्रेमातून कलह जन्मला. मारा- भारी सुरू झाली. चप्पल बघ पायातली. देईन एक ठेवून बदमाष. माझे घेतो. ” असे शब्द सुरू झाले. परंतु शेवटी भान नाहीसे झाले. सारे घेरी येऊन पडले. किळसवाणा प्रकार.

, 66 "अरे खा ना ते. नुसते बघत काय उभा राहिलास? " सैतान म्हणाला. मला नाही खाण्यात मौज वाटत. का नुसते खात बसायचे ? हे पाहा कसे लोळत पडले आहेत. मी का असा लोळू ? छे. मला दुसरीकडे ने. ही सारी डुकरे आहेत. खाण्यासाठी हपापलेली. माधव निराळा आहे. हं. ने दुसरीकडे. " माधव चिडून म्हणाला. गो-गो-४....५ प्रेमाचा पेला ६५