" आज बाहेर फिरायला जाऊ. येतोस ? त्या टेकडीवर जाऊ." माधव म्हणाला.
" मला घरी काम आहे. आज बाजाराचा दिवस. " शिष्य म्हणाला.
" जा तर घरी. आज मला फिरण्याची हुक्की आली आहे. आज नको वाचन. रोज आहेच वाचणे. " माधव म्हणाला.
शिष्य निघून गेला. माधव दिवाणखान्यात हिंडत होता. तो पुन्हा विचारात मग्न झाला. त्याने एक कपाट उघडले. त्यातील एक कुपी त्याने 'घेतली व ती खिशात ठेविली. पुन्हा येरझारा सुरू झाल्या. एकदम काही तरी ठरले. लांब अंगरखा घालून माधव बाहेर पडला.
तो झपझप जात होता. किती तरी दिवसांनी तो आज बाहेर पडला होता. लोक त्याच्या पायां पडण्यासाठी धावले. एकच गर्दी झाली. - लहान-मोठ्यांची, स्त्री-पुरुषांची झुंबड उडाली. माधव चिडला. तो संतापला.
" कशाला माझ्या पायां पडता ? " तो संतापून म्हणाला.
" वा! असे कसे म्हणता महाराज ! तुम्ही मागे औषघ दिलेत त्याने माझा रोग गेला. देव आहात तुम्ही " एक मनुष्य म्हणाला.
" अरे, तुझा रोग बरा झाला असेल तर दुसरे दहा माझे औषध -घेऊन मेले असतील. तुम्ही माणसे मोठी विचित्र. नका रे त्रास देऊ. " तो पुन्हा दुसऱ्या लोकांस म्हणाला.
शेवटी माधव पळत सुटला. निसटला एकदाचा. लोक मागे राहिले. बाजाराची गर्दी सुरू झाली. ते माधवाला विसरले. माधव आता एकटाच जात होता. बाहेर ऊन होते. परंतु त्याला भान नव्हते. रात्री चंद्रप्रकाश - त्याला आवडला; आता ऊन आवडत होते. तहान भूक सारे तो विसरला. शेकडो विचार त्याच्या मनात येत होते. ते विचार त्याला कोठे तरी नेत होते.
समोर टेकडी होती. तो आता टेकडी चढू लागला. जरा घसरला,परंतु पुन्हा सावरला. दुप्पट जोराने चढू लागला. टेकडी चढून तो वर आला. तेथे एक प्रचंड शिळा होती. त्या शिळेवर तो बसला. किती तरी वेळ बसला. तिकडे बाजार संपत आला. गाड्या परत चालल्या. सूर्यनारायणही अस्तास चालला. पश्चिमेकडे लाल-लाल झाले होते.
६० * फुलाचा प्रयोग
पान:फुलाचा प्रयोग.djvu/५२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे