पान:फुलाचा प्रयोग.djvu/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 माधवाने खिशातील ती कुपी काढली. तिचे बूच त्याने काढले. " टाकू का पिऊन ? काय करायचे जगून ? काय मिळविले ? सारे जीवन व्यर्थ आहे. मानवी जीवनात अर्थ नाही. पडू दे ही मातीत माती. " असे तो म्हणत होता. पुनःपुन्हा ती कुपी तो तोंडाजवळ ई. परंतु पुन्हा खाली येई. “ छे. जगाला कंटाळून का मरू ? निराशेने मरू ? मी भ्याड आहे ? दुनिया मला भेकड मानील. माधव भेकड नाही. माधव निराशेच्या आहारी जाणार नाही. माधव जगात कोणालाही शरण जाणार नाही. नकोत हे मरणाचे विचार आत्महत्येचे दुबळे विचार. " त्याने तो कुपो दूर भिरकावून दिली. त्याने मरण भिरकावले; पुन्हा जीवनाला मिठी मारायला तो उभा राहिला.


  • * *





असमाधान * ६९'