पान:फुलाचा प्रयोग.djvu/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नदी शेवटी सागराला मिळेल

  • * * * * * * * * *

दे या चा दरबार

  • * * * * * * * * *

परमेश्वर आपल्या दिव्य सिंहासनावर बसला होता. देवदूत स्तुति-स्तोत्रे गात होते. इंद्र, चंद्र, सूर्य, वायू सारे हात जोडून उभे होते. 'देवा, तुझा महिमा किती वर्णावा ? हे अनंत विश्व तू निर्माण केलेस. इंद्राला पाऊस पाडायला लावलेस ; सूर्याला तापावयास सांगितलेस. तुझ्या आज्ञेने वायू वाहतो, अग्नी जळतो, समुद्र उचंबळतो; तुझ्या आज्ञेने पर्वत उभे आहेत, नद्या धावत आहेत, फुले फुलत आहेत, वृक्ष डोलत आहेत, किती विविध हो सृष्टी ; किती सुंदर, किती मोठी, आणि सर्वांत कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे मनुष्यप्राणी. देवा, परमेश्वरा, तुझे सारे बुद्धिवैभव मनुष्य निर्मिण्यात ओतले आहेस. एवढासा साडेतीन हात देहात राहणारा हा मनुष्य, परंतु सर्व विश्वाचे तो आकलन करू शकेल, सर्व सृष्टीवर सत्ता गाजवू शकेल. तो पृथ्वीवर राहून ताऱ्यांचा इतिहास लिहील, पाताळातील घमामोडी वर्णील. मानवाला अशक्य असे काही नाही. परमेश्वराची अशी स्तुती चालली होती, इतक्यात तेथे सैतान आला. सारे कुजबुजू लागले. दुधात जणू मिठाचा खडा पडला. सुखात विष कालवले गेले. सर्वांच्या प्रसन्न चेहऱ्यावर वकता दिसू लागली. सैतान संतापाने व उपहासाने बोलू लागला, “पुरे करा ही स्तुतिस्तोत्रे. स्तुती करण्यासारखे काय आहे ? परमेश्वराचे अनंत विश्व दूर राहों. आपण पृथ्वीपुरतेच पाहू या. काय आहे त्या पृथ्वीवर ? त्या पृथ्वीवर सदैव मारणमरण सुरू आहे. ‘बळी तो कान पिळी' हा प्रकार सुरू आहे. कोल्हा देवाचा दरबार ५३