पान:फुलाचा प्रयोग.djvu/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
" तुला सून आणली आहे. चांगली आहे की नाही सून ?"

 " तो लफंग्या बसला आहे तुरुंगात. त्याला मी जावई करणार होतो. देवाने वाचविले. कळोचे नशीब थोर ! " म्हातारा म्हणाला.
 ती सारी फुलाच्या घरी आली. फुला व कळी फुले फुलवू लागलो. त्यांचा जोडा फार शोभे. गावातील म्हातारी माणसे त्यांचे कौतुक करीत. फुलाच्या बागेचे ढब्बूसाहेब रक्षण करी. लहान मुले-मुली फुले तोडायला येत. त्यांना तो दटावी. परंतु शेवटी फुले देई.
 कळी व फुला ह्यांचा संसार सुखाचा झाला. त्यांना जैसे सुख मिळाले तसे तुम्हा सर्वांस मिळो ! संपली ही कथा. हरो सर्वांची व्यथा.
 संपली फुलाची गोष्ट, होवोत वाचणारे संतुष्ट...

* * *

५२ * फुलाचा प्रयोग