Jump to content

पान:फुलाचा प्रयोग.djvu/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
घरी
  • * * * * * * * * *

वृद्ध आत्या घरी होती. एक दिवस

सारे चांगले होईल ह्या आशेवर तो

जगत होती. फुलाच्या बागेची काळजी

घेत होतो आणि एके दिवशी फुला घरी आला. एकटा नाही आला, तर त्याच्या बरोबर कोणी तरी होते.
 " आत्या; ओळखलेस का मला ? " फुला पायां पडून म्हणाला.
 " अरे, तुला का मी ओळखणार नाही ? आलास ? मी म्हणतच होते की, तू येशील. किती रे वाळलास ? तुरुंगातून जिवंत आलास हीच देवाची कृपा. आणि ही कोण ? "
 " तुला सून आणली आहे. राजाने माझे लग्न लावले. चांगली आहे की नाही सून ? म्हणत असस, लग्न कर. झाले ना आता तुझ्या मनासारखे ? " कुलाने प्रेमाने विचारले.
 कळी आत्याबाईच्या पायां पडली. " जन्मसावित्री हो " असा म्हातारीने आशीर्वाद दिला. तिने त्या दोघांच्या डोक्यावरून प्रेमळ हात फिरविला. तिला खूप आनंद झाला.
 नंतर एके दिवशी कळी व फुला कळीच्या वडिलांकडे गेली. उभयतां पायां पडली. फुला म्हणाला, "मला क्षमा करा ! " म्हातारा गहिवरला.
 " मी आता नोकरी पुरे करतो. तुमच्याकडे येऊन राहातो. येऊ ना कळ्ये ? मी एकटा कसा राहू इकडे ? " पिता म्हणाला.
 " तुम्हाला न्यायलाच आम्ही आलो आहोत. आता विश्रांती घ्या. आमचा संसार पाहा. तुमचा आशीर्वाद द्या."

घरी * ५१