पान:फुलाचा प्रयोग.djvu/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चमत्कार करणारा मित्र सुदैवाने वाचला. त्याने हे फूल फुलविले. त्याने ह्या मुलोकडून हा प्रयोग करविला. ही मुलगी तुरुंगाच्या अधिका-याची. ह्या थोर पुरुषाने तिला लिहा - वाचायला शिकविले. फुले फुलवणाऱ्या ह्या माळ्याने ह्या मुलीची जीवनकळीही फुलविली. ह्या एक लाख रुपयांच्या बक्षिसाच्या लोभाने पलीकडे ते काळवंडलेले गृहस्थ आहेत त्यांनी पाप केले. त्यांनी ही कुंडी लांबविली. ह्या मुलीच्या बापाचा त्याने विश्वासघात केला. ज्या शृंखला ह्या थोर पुरुषाच्या पायांत होत्या, त्याच ह्या लफंग्याच्या पायांत घालून त्याला योग्य ती शिक्षा केली जाईल.
 " परंतु आधी हा गोड समारंभ संपवू या. एक लाख रुपयांचे बक्षीस ह्या शास्त्रज्ञाला मी देतो. असेच देशाचे नाव ते वाढवोत. ध्येयाची ते अशीच पूजा करोत. कष्ट पडोत, आपत्ती येवोत, मरण समोर असो, तरी ध्येयाला कसे कवटाळावे ते त्यांनी दाखविले आहे. ते शास्त्रज्ञ आहेत. ते महात्मा आहेत. अशी माणसे म्हणजे पृथ्वीचे वैभव !
 " एक लाख रुपयांच्या बक्षिसाबरोबर दुसरेही एक बक्षीस मी ह्यांना देत आहे. ही मुलगी ह्यांना मी देत आहे. तुम्हां सर्वांसमक्ष ह्यांचे लग्न मी लावतो. तुमचे आशीर्वाद ह्यांना द्या."
 राजाने कळीचे हात फुलाच्या हातात दिले. दोघांनो राजाला वंदन केले. दोघांनी त्या विराट् जनतेला प्रणाम केला. सर्वांनी जयजयकार केला. टाळ्यांचा गजर झाला. वाद्ये वाजू लागली. बँड सुरू झाला. बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या फुलांचों वृष्टी झालो. आनंदीआनंद झाला. समारंभ संपला. कळी व फुला राजाबरोबर गेली. राजाने त्यांना मेजवानी दिली. सारे शास्त्रज्ञ हजर होते. राजाने वधूवरांस मूल्यवान् वस्त्रे व अलंकार ह्यांची भेट दिली.शास्त्रज्ञांचा निरोप घेऊन , राजाचा निरोप घेऊन कळी व फुला निघून गेली. त्या दोघांचा आनंद अवर्णनीय होता. त्या आनंदाचे कोण वर्णन करील ?


५० * फुलाचा प्रयोग