गेले. फुलाच्या पायातील शृंखला काढण्यात आल्या. त्याला पाय हलके वाटू लागले. नीट चालवेना. शिपाई हात धरून त्याला नेत होते. किती तरी दिवसांनी बाहेरची मोकळी हवा अंगाला लागली. विशाल क्षितिज दिसले. अनंत आकाश दिसले. हजारो स्त्री-पुरुषांची सृष्टी दिसली.
त्या कैद्याला राजाजवळ नेण्यात आले. कैदी फिका पडला होता, परंतु त्याच्या डोळ्यांत ध्येयनिष्ठेचे पाणी होते. राजाने त्याला सन्मानपूर्वक जवळच्या आसनावर बसविले. त्या कैद्याला पाहाताच तो पाहुणा काळवंडला. गब्रू घाबरला. त्याची मान खाली झाली. त्याला आपण पडणार असे वाटले.
राजा बोलू लागला. लोक ऐकू लागले.
" हा जो यशस्वी प्रयोग येथे आहे, तो कोणी केला ? हे येथे एक गृहस्थ आहेत. त्यांचे नाव गनू. त्यांनी आपली मान विनयाने खाली घातली आहे. हे गब्रू म्हणतात की, ' हा प्रयोग मी केला. ' त्यांना जर शास्त्रीय माहिती विचारली तर ते म्हणतात, ' मी प्रयोग केला आहे ; माहिती मागून देईन. ' ही माझ्या डाव्या बाजूस सुंदर मुलगी बसली आहे. ती म्हणते, 'हा प्रयोग मी केला. ' प्रयोग कसा कसा केला त्याची माहिती तिने टिपून ठेवली आहे. ही पहा तिची रोजनिशी. हिच्यात सारे आहे. परंतु ह्या मुलीला कोठून आले हे ज्ञान ? ते ज्ञान तिला आता आणलेल्या ह्या थोर पुरुषाने दिले. हा पुरुष तुम्ही ओळखलात का ? ज्याला तुम्ही फाशी देणार होतेत, तोच हा महात्मा. तुरुंगातही ध्येयपूजा त्याने सोडली नाही. ह्याच्यासंबंधाने सारे कागदपत्र मी वाचले. हा थोर पुरुष निर्दोष आहे आणि ज्या दोन प्रधानांचा प्रजेने खवळून वध केला ते प्रधानही निर्दोष आहेत. जे कागदपत्र ह्या. कैद्याच्या घरी सापडले त्यात काय होते ? देशासाठी त्या प्रधानांनी काय-काय केले, किती त्याग केला, किती आपत्ती सोसल्या, त्यांचा पुरावा होता. परंतु ते कागद जाळून टाक. आमचा त्याग जगाला. कळायला कशाला हवा ? अज्ञात असू दे आमचा त्याग ' अशी चिठ्ठी त्या प्रधानांनी आपल्या मित्राला पाठवली होती, परंतु ह्या मित्राने ते कागद जाळले नाहीत. असो. ते थोर प्रधान तर गेले. परंतु ह्या पुष्पसृष्टीत
४८ ** फुलाचा प्रयोग