कैदी घोड्याच्या गाडीत बसविण्यात आला. त्याच्या बाजूस सशस्त्र शिपाई बसले आणि गाडी वेगाने निघाली. आपल्याला तोफेच्या तोंडी देण्यासाठी नेण्यात येत असावे असे फुलाला वाटले.
" कोठे नेता मला ? " त्याने विचारिले.
" चूप. बोलना नहीं, पूछना नहीं. " शिपाई म्हणाला.
तिकडे समारंभ सुरू झाला. प्रार्थनागीत झाले. राजा बोलायला "उभा राहिला. टाळ्यांचा कडकडाट झाला. जणू आकाश खाली पडते की काय असे वाटले. राजाने हात वर करताच सारे शांत झाले.
“ जमलेल्या नाना देशांतील थोर शास्त्रज्ञांनो व सर्व स्त्री-पुरुषांनो, आजचा दिवस आनंदाचा आहे. शास्त्रांचा गौरव करण्याचा आजचा 'दिवस आहे. शास्त्राने संहारही करता येतो व जीवनात आनंद व सौंदर्य ह्यांचीही निर्मिती करता येते. शास्त्रांचा उपयोग संसार आनंदमय करण्यासाठी करणे ही खरी शास्त्रपूजा, शास्त्राने मारक शस्त्रे निर्मू 'नयेत. शास्त्राने मनुष्याला माकड बनवू नये. मनुष्याला वृक-व्याघ्राहून -क्रूर करू नये. शास्त्राने माणुसकी वाढो, आनंद वाढो. आज आपण बक्षीस देणार आहो. परंतु कोणाला ? बाँबचा शोध लावणान्याला नाही. तोफेचा गोळा शंभर मैल जाण्याचा प्रयोग करणाऱ्याला नाही, तर सृष्टीतील - सौंदर्य व आनंद वाढविणान्याला. शास्त्राने सुबत्ता निर्मिता येईल. फुले-फळे वाढविता येतील. फुलांचा प्रयोग करणाऱ्याला आज बक्षीस द्यावयाचे आहे. कृष्णकमळावर, निळ्या- सावळ्या कृष्णकमळावर सोनेरी छटा उमटविणाऱ्याला हे बक्षीस द्यावयाचे होते. अनेक देशांतील फुलवेड्या शास्त्रज्ञांनी प्रयोग केले. आपल्या प्रयोगांची फुले त्यांनी येथे आणिली आहेत. सर्वांनाच सारख्या प्रमाणात सिद्धी मिळाली नाही, परंतु एक प्रयोग यशस्वी झाला. तो प्रयोग येथे ठेवण्यात आला आहे. पाहा हे फूल. किती सुंदर दिसते आहे ! पाहा ह्या सोनेरी छटा. कृष्णरंगावर • सोनेरी वेलबुट्टी. अभिनव प्रयोग... "
राजाचे भाषण असे चालू होते इतक्यात ती गाडी आली. सर्व लोकांचे लक्ष तिकडे गेले. राजाने दूतांना तिकडे पाठविले. “ शृंखला काढून कैद्याला येथे आणा. " अशी त्याने सूचना दिली. दूत वेगाने
फुलाला दोन बक्षिसे ४७