पान:फुलाचा प्रयोग.djvu/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फू हा ला दोन बक्षिसे

  • * * * * * * * * ***

तो पाहुणा फुलाची कुंडी घेऊन प्रदर्शनाच्या गावी गेला. तेथे नाना देशांतून फुले आली होती, शास्त्रज्ञ आले होते, परंतु संपूर्णपणे कोणाचाच प्रयोग यशस्वी झाला नव्हता. कोणाच्या एकाच पाकळीवर सोनेरी छटा उठली होती. कोणाची पुसट होती, परंतु या पाहुण्याने जे फूल आणिले ते संपूर्णपणे कसोटीला उतरत होते, सारे शास्त्रज्ञ पाहात राहिले. “ आपले नाव काय ? " त्या पाहुण्यास विचारण्यात आले. 66 गब्रू. " पाहुणा म्हणाला. " आपले नाव आजपर्यंत ऐकले नव्हते. आपले संशोधनात्मक लेख कधी प्रसिद्ध नाही वाटते झाले ? कोठे राहाता आपण ? कोठे आहे प्रयोगशाळा ? ” अनेक प्रश्न गब्रूला विचारण्यात आले. गाजावाजा मला आवडत नाही. मी लहानसा माळी. माझी प्रयोगशाळा वगैरे नाही. मी नाना गोष्टी करीत असतो. मला प्रयोगांची हौस आहे, वाटले की आपणही करावा प्रयोग करीत होतो, यश आले. तसे शास्त्रीय ज्ञान मजजवळ नाही, उपपत्ति सांगता येणार नाही. कसे कसे फूल वाढले ते टिपलेले नाही. आम्ही साधी माणसे. " गब्रू म्हणाला. प्रदर्शनासाठी राजा आला होता. उद्या बक्षीससमारंभ होता. भव्य मंडप घालण्यात आला होता. ध्वजा-पताकांनी, लता-पल्लवांनी, फुलांच्या रंगी-बेरंगी सुगंधी अशा हारांनी, तोरणांनी तो मंडप सुशोभित करण्यात आला होता. अनेक शास्त्रज्ञ राजाच्या भेटी-गाठी घेत होते. गब्रूची राजाशी भेट करण्यात आली. ४४ * फुलाचा प्रयोग