पान:फुलाचा प्रयोग.djvu/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ती कुंडी गजांबाहेर ठेवण्यात आली. सुंदर फूल फुलले होते. कृष्णवर्ण पाकळ्यांवर सोनेरी छटा, फुला पाहात राहिला. त्याने बाहेर हात लांबविले. त्या फुलाला त्याची बोटे लागली. ते फूल नाचू लागले. ते वारा आला म्हणून नाचले, का त्या बोटांतील भावनामय स्पर्शाने नाचले ?
 " पुरे आता. " शिपाई म्हणाले.
 " बरे." फुला म्हणाला.
 " वॉर्डरांनी कुंडी नेली. शिपाई गेले. कळीही निघून गेली. ती झोपली. पहाटे उठून ती जाणार होती. चार घोड्यांची गाडो तिने ठरविली होतो.
 परंतु पाहुणा आधी उठला. त्याने किल्ली कुलपाला लावली. त्यान द्रव्याने वश केलेल्या शिवरायांकडून ती कुंडी बाहेर नेवविली तेथे त्यानेही गाडी तयार ठेविली होती. कुंडी गाडीत ठेवण्यात आली. गाडी भरधाव निघाली.दूर गेली.
 पहाट झाली. कळी उठली, ती खोलीत गेली. तो कुंडी नाही ! ती खांबासारखा उभी राहिली. घेरी येईल असे तिला वाटले. तिच्या डोळ्यांसमोर एकदम तो पाहुणा आला. तिने पाहुण्याचा तपास केला, परंतु तपास लागेना. त्या पाहुण्यानेच कुंडी लांबविली ह्यात संशय नाही असे तिला वाटले. तो भीत-भीत फुलाकडे गेली. तिने फुलाला हाक मारली. तिने त्याला सारी हकीकत सांगितली.
 " आता ताबडतोब जा. तुझी रोजनिशी घेऊन जा तुझे म्हणणे तेथे सांग. हे फूल मी फुलविले असे स्पष्टपणे बोल, जा. थांबू नकोस. सत्याला यश येईल. " तो म्हणाला.
 तो गेली. तिची ती ठरलेली गाडी बाहेर उभी होती. तीत बसून ती गेली.पाहुण्याच्या पाठोपाठ तीही निघाली.
 सकाळी ढब्बूसाहेब उठले. परंतु कळो कोठे दिसेना. तिचे अंथरूण रिकामे होते. कोठे आहे कळी ? त्याने सर्वत्र पाहिले, सर्वत्र शोधले,परंतु कळीचा पत्ता नाही. आणि ते श्रीमंत पाहुणे ? त्यांचाही पत्ता नाही. तो श्रीमंत पाहुणा आपला पुढे-मागे जावई व्हावा असे ढब्बूसाहेबांस वाटत होते. म्हणून त्यांनी त्याला घरी ठेवून घेतले, त्याचा मान-सन्मान ठेविला. परंतु तो पाहुणा का कळीला घेऊन पळून गेला ? पित्याला न सांगता ?
४२ फुलाचा प्रयोग