पान:फुलाचा प्रयोग.djvu/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



तु रुं गा ती ल

प्र यो ग

* * *

त्या दिवशी उजाडत ढब्बूसाहेब

फुलाच्या कोठडीजवळ एकदम आले.

शिपायाने कोठडी उघडली. साहेब

आत शिरले. ते खोलीत पाहू लागले. तेथे मडक्यात तो वेल वाढत होता. संशयी साहेब त्या वेलाकडे टक लावून पाहू लागले.
 " हा कसला वेल ? हा वेल वाढवून खिडकीतून खाली सोडायचा असेल. त्या दोराच्या साहाय्याने पळून जायचे असेल. होय ना ? मोठे बिलंदर बोवा तुम्ही क्रान्तिकारक, कोठे काय कराल त्याचा नेम नाही, कोठून आणलेस हे मडके ? कोठून आणलीस माती ?"
 “ मडके मला मिळाले होते. माती मी मागितली. हा साधा फुलवेल आहे. ह्याने मी कसा पळणार ? खिडकीला भलेभक्कम गज आहेत. साहेब, काहीच्या काही शंका घेऊ नका. तुरुंगातील एवढा तरी माझा आनंद नाहीसा नका करू. हा वेल वाढविणे, त्याची पाने पाहाणे ह्यात माझा वेळ जातो. "
 " तुरुंग का सुखासाठी असतात, आनंद देण्यासाठी असतात ? तुम्हांला वास व्हावा, कंटाळा यावा ह्यासाठी तुरुंग असतात. ते काही नाही. शिपाई, फोडा ते मडके, तोडा तो वेल. खबरदार कोणी माती वगैरे पुन्हा द्याल तर. क्रान्तिकारक मोठे पाताळयंत्री असतात. मोठे कारस्थानी. बघता काय ? फोडा ते मडके. "
 " नका फोडू. माझा सारा आनंद, माझा प्रयोग, नका नष्ट करू. "
 “ प्रयोग ? अरे लबाडा. पळण्याचा प्रयोग होय ना ? फोडा, तुकडे करा त्या मडक्याचे. त्या वेलाचेही तुकडे करा."

गोगो-४....३

तुरुंगातील प्रयोग * ३३