पान:फुलाचा प्रयोग.djvu/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " तुला अद्याप वाचता येत नाही. तू वेडी आहेस."
 " मी तुमच्या डाळ्यावरून वाचले. तुमच्या स्पर्शावरून वाचले. तुमची बोटे थरथरत होती, त्यावरून वाचले. अक्षरे मला वाचता येत नाहीत. परंतु डोळे वाचता येतात. मी तुम्हांला आवडत नाही ?"
 " आवडतेस."
 " आता मला वेडी नका ठेवू. मला शहाणी करा. मी पाटी घेऊन येत जाईन. मला धडा देत जा. मी भराभर शिकेन. म्हणजे तुम्हांला अधिक आवडेन. खरे ना ?” असे म्हणून कळी निघून गेली. दुसऱ्या दिवसापासून ती तुरुंगातील शाळा सुरू झाली. कळीचे जीवन फुलू लागले. फुला खतपाणी घालू लागला. कळी पाटी आणी. फुला गजांतून तो घेई. तिच्यावर तो अक्षरे लिही. तो तिला उजळणी सांगे. ती अक्षरे वाचायला सांगे. मग कळी खाली जाई. ती खोलीत बसे व गिरवी. धडा पाठ करून ठेवी.
 " तुमचे नाव कसे लिहायचे ते मला शिकवा आज. " ती म्हणाली.
 " आधी स्वतःचे नाव लिहायला शीक."
 " माझ्या वस्तूंवर मी तुमचे नाव लिहिणार आहे. माझ्या रुमालावर, माझ्या उशीवर, माझ्या अंगातल्यावर."
 " मग त्या वस्तू माझ्या होतील. "
 " मी तुमची आहे. म्हणून माझ्या वस्तूही तुमच्या नाहीत का ? हसता काय ? शिकंवा ना तुमचे नाव. काय आहे तुमचे नाव ?"
 “ कळी फुलली म्हणजे काय होते ?"
 " फूल."
 " त्या फुलाला हाक कशी मारशील ?"
 " फुला, अरे फुला, अशी. "
 " हेच माझे नाव. दोनदा घेतलेस माझे नाव."
 " फुला का तुमचे नाव ? किती छान नाव. सान्या जगाला ' फुला ' असे सागता वाटत ? सर्वांना फुलवणारे, फुला असे सांगणारे. ह्या कळीला फुलवणारे. 'फु' कसा लिहायचा ? सांगा ना. " त्याने पाटीवर स्वतःचे. नाव लिहून दिले; 'फुला' फुला' असे घोकीत नळी निघून गेली.

३२ फुलाचा प्रयोग