Jump to content

पान:फुलाचा प्रयोग.djvu/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स मु द्र का ठ च्या

तु रुं गा त

  • * * * * * * * * *

फुलाला राजधानीतील तुरुंगात ठेवणे

धोक्याचे होते. केव्हा लोक बिथरतील

त्याचा नेम काय ? राजाने समुद्र-

काठच्या एका दूरच्या तुरुंगात फुलाची रवानगी केली. फुलाची खोली एकान्त होती. त्या खोलीला एकच खिडकी होती. फुला उडी मारी व त्या खिडकीतून उचंबळणारा समुद्र बघे. समुद्राच्या लाटांवरचा फेस बघे. पाण्याच्या बागेतील फुले पाहून त्याला आनंद होई. आपल्याला बागेत पाठवतील का कामाला येतील का फुलांना हात लावता ? येतील का प्रयोग करता ? असे त्याच्या मनात येई.
 परंतु त्याला खोलीतून बाहेर काढण्यात येत नसे. खोलीतच त्याचे स्नान, खोलीतच शौचमुखमार्जन. तेथेच भोजन, तेथेच शयन. तेथेच चिंतन, तेथेच मनन. ती खोलो म्हणजेच सारे काही.
 त्याला दोन मडकी देण्यात आली. फुलाने एका मडक्याची कुडी केली. खिशातील एक कलम त्याने त्या कुंडीत लावले. एका शिपायाजवळून त्याने माती घेतली होतो. त्या मडक्यात माती भरून त्यात तो प्रयोग सुरू झाला. निळ्या फुलावर सोनेरी छटा उठवण्याचा प्रयोग मडक्यातील वेल वाढू लागला. कोवळी पाने फुटली ती पाने पाहून फुलाला आनंद होई. त्या पानांकडे तो दिवसभर बघत बसे.
 समुद्रकाठच्या खिडकीतून एके दिवशी एक पक्षी खोलीत आला. कोठून आला तो पक्षी ? निळा-निळा पक्षी. त्या खोलीत येऊन तो पक्षी गाणे गाई. काही वेळ त्या खिडकीत बसून निळ्या समुद्राकडे पुन्हा उडून जाई. तो पक्षी आपल्या आत्याकडून का आला होता ?


समुद्रकाठच्या तुरुंगात २९