Jump to content

पान:फुलाचा प्रयोग.djvu/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " मात्र फसवू नका. "गब्रू म्हणाला.
 " मांग फसवीत नसतो. "
 " सकाळी तेथे असेन."
 " ठीक. "
 गब्रू गेला. केव्हा उजाडते असे त्याला झाले. आज रात्र का मोठी झाली ? आज सूर्य का कोठे पळाला ? अजून कोंबडा का आरवत नाही ? पाखरे का किलबिल करीत नाहात ? कधी संपणार रात्र ? शेवटी एकदाचे उजाडले. आज उजाडता फुलाला फाशी द्यावयाचे होते. लोकांच्या झुंडी बाहेर पडल्या. फाशी जाणाऱ्याचे हाल पाहाण्यासाठी थवे जात होते.-" देशद्रोह्याला शिक्षा, द्या फाशी, " अशा गर्जना करीत लाक येत होते.
 फुला शातपणे प्राथना करीत होता. त्याच्या तोंडावर मंगल प्रसन्नता होती. त्याच्या कोठडीसमार कळी येऊन उभी होती. परंतु त्याचे लक्ष नव्हत. एकदम बाहर जयघोष झाले. गर्जना झाल्या. फुलाने खिडकीतून. पाहिल. तो हसला. त्यान दाराकडे पाहिले, तो कळो रडत होती.
 " रडू नका, " तो म्हणाला.
 " माझ्या बाबांना क्षमा करा. " तो म्हणाली.
 " माझ्या मनात कोणाविषयी राग नाही."
 " आता तुम्हांला नेतील. "
 " घाबरू नका. वाईट वाटून घेऊ नका."
 " किती तुम्ही थोर ! पृथ्वीवरचे तुम्ही देव. "
 इतक्यात ढब्बूसाहेब तेथे आले. सशस्त्र शिपाई आले. कोठडीचे दार उघडण्यात आल. दोन्या बांधून फुलाला त्यांनी नेले. कळी रडू लागली. ती आपल्या खोलीत गेली. ती देवाची प्रार्थना करीत होती. बाहेर लोक फाशीसाठी अधीर होते आणि गब्रू वधस्तंभाच्या जवळ गर्दीत उभा होता.
 जिकडे तिकडे कडेकोट बंदोबस्त होता. लोक आता अधीर झाले होते. इतक्यात फाशी जाणारा जीव त्यांच्या दृष्टीस पडला. लोकांनी टाळ्या. वाजविल्या.
 " फाशी जायचे आहे तरी हा दुःखी नाही."
 " बेरड आहे हा बेरड. "


२६ फुलाचा प्रयोग