पान:फुलाचा प्रयोग.djvu/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 " मी काय देणार ? "
 " काही तरी दिले पाहिजे. माझ्या ह्या मुलाबाळांना नको का सुख ?"
 " तुम्ही फाशी देता, तरी मुलांना खेळवता. तुम्ही कठोर नाही झालेत ? "
 " वाघीण का पिलांना चाटीत नाही ? आणि फाशी देणे आमचा धंदा आहे. आम्ही क्रूर नाही. पटकन् कसे फाशी द्यावे ते आम्हांला समजते.. फाशीची शिक्षा झाल्यावर कोणी तरी फाशी देणारा हवा ना ? हालहाल होऊ न देता पटकन् फास बसेल असे करणारा नको का कोणी ? फाशी जाणारा पटकन मरेल ह्याची मी काळजी घेतो. परंतु 'फाशी दिल्याबद्दल मला काय मिळते ? तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक फाशीच्या शिक्षेस हजर राहाण्याबद्दल वीस-वीस रुपये मिळतात, तर आम्हांला प्रत्यक्ष फास लावणान्यास दोन-दोनच रुपये ! असो. काय देणार बोला. "
 " दहा रुपये देईन."
 " निघून जा . काम होणार नाही."
 " पन्नास देईन."
 " छट्. "
 " शंभर घ्या."
 " पाचशे देता ? "
 " पाचशे ? "
 " हो."
 " तीनशे देतो ! आता अधिक मागू नका."
 " परंतु पैसे आता मोजा. "
 " आत्ता ?"
 " हो."
 " मी रात्री आणून देतो."
 एक लाख रुपये पुढे मिळतील ह्या आनंदात गन होता. त्याने शहरातील एका सधन आप्ताकडून कर्ज काढले. रक्कम घेऊन तो रात्री मांगाकडे गेला. मांगाने पैसे मोजून घेतले.


राजा आला, फुला वाचला २५