रा जा आ ला ,
फू ला या च ला
*********
फुलाचा तो शेजारी गब्रू राजधानीत
आला होता. फुलाला फाशीची शिक्षा
झाल्याचे त्याला कळले. फुलाच्या
अंगरख्याच्या खिशात ती कलमे असतील, ते प्रयोग असतील; परंतु कसा मिळवावयाचा तो अंगरखा ? फुलाला त्याच्या कपड्यांतच फाशी देतील का ? सरकार स्वतःचे कपडे कशाला खर्च करील ? फुलाच्या प्रेताची व्यवस्था कोण करणार ? ते मांगच बहुधा ते काम करतील. त्या मांगांकडे जावे. फुलाचे कपडे त्यांनी द्यावे असे ठरवावे.
गब्रूच्या मनात असे विचार आले. फाशी देणाऱ्या मांगाच्या घरों तो मेला. मांगाच्या मांडीवर लहान मूल होते. मांग त्या मुलाला खेळवीत होता.
" तुम्हीच ना त्या कैद्याला उद्या फाशी देणार ? " गब्रूने विचारले.
" हो. काय काम आहे ?"
" तुम्हांला एक विचारायचे आहे."
" तुम्ही का फाशी जाणाऱ्याचे नातलग ? "
" हो."
" मग ?"
" त्यांना फाशी दिल्यावर ते प्रेत माझ्या ताब्यात द्या. प्रेत न देता आले, तर निदान त्याच्या अंगावरील कपडे तरो द्या. तेवढी आठवण राहील. ते कपडे आम्ही घरात ठेवू. तेच पाहू. नाही म्हणू नका."
" प्रेत नाही देता येणार. कपड्याचे पाहीन. परंतु तुम्ही मला काय द्याल ?"
२४ * फुलाचा प्रयोग