पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/23

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अनुताई आणि प्रत्यक्ष सहवासात दिसून आलेल्या अनुताईंनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची अमीट छाप मजवर सोडली आहे.
 अनुताई वाघ या साध्या पदवीधर. पण शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपल्या प्रयोगशीलतेतून एक नवी पद्धती उदयाला आणली. त्यांना गुरूस्थानी असलेल्या ताराबाई मोडकांच्या जन्मशताब्दी वर्षात अनुताईंनी आपला निरोप घेतल्याने बालशिक्षणाचा नंदादीप तेवत ठेवण्याची जबाबदारी आता आपणा सर्वांवर येऊन पडली आहे.
 अनुताई वाघ यांचा जन्म १७ मार्च १९१० रोजी पुणे येथे गरीब कुटुंबात झाला. तत्कालीन रीतिरिवाजाप्रमाणे विवाह म्हणजे काय, हे कळण्याचं वय होण्यापूर्वी विवाह झाला व दुर्दैवानं त्यांना अल्पकाळात वैधव्य आले. पुण्याच्या हुजूर पागा शाळेत त्यांनी १३ वर्षे अध्यापन कार्य केले. पुढे त्या श्रीमती ताराबाई मोडकांच्या सहवासात आल्या. ताराबाईंबरोबर त्यांनी १९४४ ते १९५६ या काळात बोर्डीत बालशिक्षणाचे धडे घेतले. त्यांची पहिली बालवाडी महार, भंगी इत्यादींच्या वस्तीत सुरू झाली. पुढे तिने आदिवासींच्या अंगणात भागातील वस्ती, पाड्यांत दिसून येणाच्या येणाच्या ‘अंगणवाड्या' या अनुताईंच्या कार्याच्या 'चेतनामय स्मृती' होत. ‘ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा' अशी घोषवाक्ये घराघरांवर लिहिण्याचा प्रचारी, दिखाऊ शिक्षणाचा प्रसार अनुताईंनी कधीच केला नाही. अंधार फार झाला म्हणून आपल्यातील पणती त्यांनी सतत मिणमिणती ठेवली. त्यांच्यामागे समर्पित कार्यकर्त्यांचं फार मोठं मोहोळ होतं अशातला भाग नाही. पण प्रश्नाला जाऊन भिडण्याची प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये होती. हे सर्व करत असताना केल्याचा आविर्भाव कधी त्यांच्यात दिसला नाही. मंदपणे व सतत तेवत राहणा-या नंदादीपाप्रमाणे त्यांचे कार्य होतं. वयाच्या बावन्नव्या वर्षी व तेही एक डोळा गेलेल्या स्थितीत अनुताईंनी पुणे विद्यापीठाची बी. ए. पदवी संपादन केली. त्याच विद्यापीठाने पुढे त्यांना डी. लिट. ही मानद उपाधी देऊन गौरविले ते शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या असाधारण कामगिरीमुळेच.

 अनुताईंच्या कार्याचा प्रवास शिक्षणाकडून समाजकल्याणाकडे सतत होत राहिला. आपल्या उत्तरायुष्यात त्यांनी महिला अपंग कल्याण कार्यातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. कोसबाडची टेकडी असो की दाभोणचे जंगल, सर्वच ठिकाणी अनुताईंनी वंचितांच्या समग्र विकासाचा ध्यास घेतलेला दिसतो. आपल्या जीवन काळात त्यांनी ११ बालवाड्या, १० पाळणाघरे,

प्रेरक चरित्रे/२२