पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वंचितांच्या वाली : अनुताई वाघ

वर्षापूर्वीच अनुताईंची भेट झाली होती. त्या भेटीत त्यांचा ८0 वर्षीय उत्साह त्यांच्यापेक्षा निम्मे वय असलेल्या माझ्यासारख्या मधल्या फळीच्या कार्यकर्त्यास लाजवणारा होता. अनुताई आल्या होत्या एका शैक्षणिक शिबिरासाठी. पण अनाथ मुलांच्या संगोपन व पुनर्वसनाचे काम पाहायचे म्हटल्यावर सर्व मोह बाजूला सारून त्यांनी बालकल्याण संकुलाकडे धाव घेतली. संकुलाच्या वात्सल्य बालसदनमधील अनाथ अर्भकांना पाहून त्यांचे पाझरलेले मातृत्व प्रतिबिंबित डोळे भरभरून पाहण्याचे भाग्य मला लाभले. तिथेच बागडणा-या चिमुकल्यांना त्यांनी बडबडगीत शिकवताना पाहिले तेव्हा आठवले की कृष्णाबाई मोटेंनी म्हटलेले खरे होते की, ‘अनुताई आगगाडीत बसल्या तरी बालवाडी चालवतील.' अनुताई पुढे शाळेत जाणाच्या मुला-मुलींत रमल्या. मुलांनी त्यांना त्यांचा आपल्या पाठ्यपुस्तकात असलेला धडा शिकवा म्हणून आग्रह धरल्यावर चक्क त्यांनी तो शिकवलाही. हाडामासी 'शिक्षक' भिनलेल्या अनुताईंमध्ये ओथंबलेले मातृत्व माझ्या आयुष्यात सतत डोळ्यांनच्या कडा पाणावत राहते. मुलांचा निरोप घेऊन निघालेल्या अनुताई मोटारीत बसलेल्या उतरल्या नि ५१ रुपये माझ्या हाती देत म्हणाल्या, 'मुलांना खाऊ आणायला विसरले, आठवणीने द्या.' पुढे कोसबाडला गेल्यावर त्यांनी आपले नवप्रकाशित पुस्तक ‘दाभोणच्या जंगलातून' स्वाक्षरीसह साशीर्वाद मला पाठवले. या साच्यातून वंचितांच्या वाली’ होण्याचा प्रत्यय त्या मला सतत देत राहिला. 'कोसबाडच्या टेकडीवरून' नि ‘दाभोणच्या जंगलातून' दिसलेल्या

प्रेरक चरित्रे/२१