पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सर्वोदयी विश्वस्त : अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे

विश्वस्त होणे ही जशी वृत्ती आहे, तसा तो धर्मही आहे. विश्वस्त वृत्तीची कल्पना जनमानसात रूढ झाली ती गेल्या शतकाच्या आरंभीच्या काळात. महात्मा गांधींनी देशाचे सुराज्य करण्यासाठी जे अनेक उपाय सुचवले होते, त्यात सामाजिक समता निर्माण करण्याचा उपाय म्हणून त्यांनी विश्वस्ताच्या कल्पनेचा पुरस्कार केला होता. परंतु ही कल्पना काही या युगाची अथवा गांधीजींची देणगी म्हणता येणार नाही. या कल्पनेचा उगम महाभारताच्या एका श्लोकात असल्याचे आपणास दिसून येईल. महाभारतात म्हटले आहे की, ‘धर्मार्थ यस्य वित्तेहा वरं तस्य निरहिताः' - अर्थात संपत्ती मिळवावी आणि नंतर तिचा धर्मासाठी विनियोग करावा, अशी इच्छा धारण करण्यापेक्षा संपत्तीची इच्छाच माणसाने धरू नये, हे अधिक श्रेयस्कर.
 महात्मा गांधींच्या नि महाभारतातील विश्वस्त कल्पनेत फरक आहे. महात्मा गांधींच्या विश्वस्त कल्पनेत अतिरिक्त संपत्तीचा विनियोग अपेक्षित आहे तर महाभारतातील कल्पनेने धनप्राप्तीच न करणे. आण्णासाहेब सहस्त्रबुद्धे एक विश्वस्त म्हणून या दोन्ही कसोटीस उतरणारे एकमेवाद्वितीय असावेत. अण्णांनी धनप्राप्तीचा कधी हव्यास धरला नाही. ‘पर धन विष समान' म्हणत मात्र त्यांनी अत्यंत निरपेक्ष वृत्तीने सामाजिक धनसंचयाचे संवर्धन, रक्षण व विनियोग करून एका सचोटीच्या कार्यकत्र्याचे आदर्श रूप आपल्या जीवनाद्वारे उभे केले.

 सन १९३२ च्या आंदोलनात साने गुरुजींना तुरुंगवास भोगावा लागला

प्रेरक चरित्रे/१४