पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होता. 'चले जाव' चळवळीत जे तरुण कार्यकर्ते सार्वजनिक कार्यात आले, त्यांना निर्वेधपणे आपले काम करता यावे, या हेतूने पावने दोन लाखांचा निधी जमा करण्यात आला. विनोबांच्या हस्तेच तो गुरुजींना देण्यात आला. या निधीच्या विनियोगासाठी एकमेव विश्वस्त म्हणून अण्णांची योजना गुरुजींनी केली. अण्णा साने गुरुजींच्या कार्याचे विश्वस्त झाल्याचा हा पहिला प्रसंग. पुढे अण्णांनी ठरलेली काही रक्कम साधना प्रेस, साधना प्रकाशन व साधना साप्ताहिकासाठी दिली.

 अण्णा अनेक सामाजिक संस्थांचे विश्वस्त होते. या संस्था विविध क्षेत्रांतील होत्या. शैक्षणिक, सामाजिक, कृषी इत्यादी. या संस्था सर्व भारतभर विखुरलेल्या होत्या. कोल्हापूरची ‘कोरगावरकर धर्मादाय संस्था', बेंगलोरचा ‘विश्वनीडम' शेती प्रकल्प, गोपुरी आश्रम, सेवाग्राम आश्रम अशा कितीतरी संस्थांची नावे घेता येतील. या विविध संस्थांमधून विश्वस्त भूमिकेतून दिसणारे अण्णा आपण जेव्हा आपण पाहायला लागलो, तेव्हा आपल्या हे लक्षात आल्यावाचून राहात नाही की, अण्णांच्यातील विश्वस्त हा कर्मठ गांधीवादी नव्हता. अण्णांच्यातील विश्वस्त हा गांधीवादी संकल्पना, विज्ञान नि व्यवहार यांच्या समन्वयाने बनलेला एक प्रगतीशीलं समाजसेवक होता. अण्णांनी... जिथे विश्वस्त पद स्वीकारले तिथे तिथे आपल्या या विज्ञाननिष्ठ दृष्टीने सुधारणा घडवून आणल्या. मी एकच उदाहरण सांगतो बेंगलोरचा ‘विश्वनीडम' कृषी प्रकल्प दहा हजार रुपये तोट्यात होता. अण्णा तिथे गेल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, तेथील गोरस शाळेस पांजरपोळाचे रूप आले आहे. ज्या गोरस शाळेची स्थापना दुग्धोत्पादनासाठी झाली होती ती भाकड गायी पोसणारे केंद्र बनली होती. गाईचे दूध पाड्यांसाठी खर्च व्हायचे. अहिंसेच्या या भ्रामक कल्पनेस अण्णांनी बाजूस सारून आपली कृती कशी अव्यवहार्य आहे, हे कार्यकत्र्यांना पटवून दिले. शेती अथवा शेतीपूरक कोणताही उद्योग उत्पादन खर्च व निघणारे उत्पादन यांचा मेळ घातल्याशिवाय किफायतशीर ठरत नसतो, हे त्यांनी दाखवून दिले. गाईला दिले जाणारे खाद्य व तिच्याकडून मिळणारे दूध यांची व्यवहार्य सांगड घालून दिली व बघता बघता 'विश्वनीडम' कृषी प्रकल्प फायद्यात चालू लागला. याच वैज्ञानिक नि व्यवहार्य दृष्टिकोनाचा पुरस्कार करून त्यांनी मांजरीचा सुभाष सहकारी शेती प्रकल्प किफायतशीर कसा होईल, हे दाखवून दिले. बदलत्या काळाप्रमाणे घडून येणा-या वैज्ञानिक, औद्योगिक विकासाकडे गांधी विचाराच्या पारंपारिकतेमुळे जर आपण डोळेझाक

प्रेरक चरित्रे/१५