पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पंडितजींची कोणतीच मैफल त्यांनी कधी अर्धी सोडली नाही. अभिनेत्री सुलोचना यांनी आपल्या वहिनी वारल्यानंतर तिचे सारे दागिने संरक्षण निधीला दिले. त्या वेळी यशवंतराव चव्हाणांना चित्रपटातील त्यांच्या भूमिका आवडत. कारण त्यात महाराष्ट्र गृहिणींचा आदर्श असे. त्यांच्या या सेवेचं त्यांना मोठं कौतुक. म्हणत “आपली आई, बहीण, वहिनी आसावी तर तुमच्यासारखी असं एका चित्रपट अभिनेत्रीबद्दल वाटायला लावणं... ही किती मोठी समाजसेवा!" असं कौतुक फक्त यशवंतराव चव्हाणच करू शकतात. कारण त्यांच्यात एक उपजत शहाणपण, शालीनता, प्रतिभासंपन्नता, प्रगल्भता होती. ती त्यांनी वाचन, अनुभव, संघर्षातून मिळविली होती. स्वतःचा बळी देऊन दुस-याचे उपकार स्मरायचे. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचे मोठेपण आपल्याकडे चालून आलेलं पंतप्रधानपद इंदिरा गांधीसाठी सोडून सिद्ध केलं होतं. पुढे इंदिरा गांधींना त्यांचं स्मारण राहिलं नसलं तरी तरी यशवंतरावांनी स्वतःस सतत मुख्य राष्ट्रीय प्रवाहाशी जोडून राहण्याच्या प्रतिबद्धतेपोठी प्रसंगी कमीपणा, कटुता स्वीकारली. पण सुसंस्कृतपणा मात्र कधी सोडला नाही. शेवटच्या दिवसात वेणुताई, पुतण्या गेल्यानंतरचा त्यांचा काळ विजनवासाचा होता. तोही त्यांनी सुसंस्कृतपणानी, संयमानी स्वीकारला.

प्रेरक चरित्रे/१३