पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८८) वजा केले ह्मणजे इ० स० पूर्वी १४१० या वर्षी धनिष्ठांभोग ९ राशी येतो, ह्मणजे त्या वर्षी धनिष्ठारंभी उदगयन होत असे. यावरून ज्योतिषाचा. हा काल होय. प्रो. व्हिटनीच्या मताप्रमाणे वीटाडेल्फिनी ही योगतारा धरिली तर याहून ७२ वर्ष अलिकडे येतील. ह्मणजे इ. स. पूर्वी १३३८ हा काल होईल. धनिष्ठा नक्षत्राच्या सर्व तारांचे भोग १ अंशाहून जास्त फरकानें नाहींत. तेव्हां वरील कालाहून माग किंवा पुढे काळ जाणार नाही. सामान्यतः इ. स. पूर्वी १४०० हा काळ मानावा. कोलबक इत्यादिक काल काढितात तो असाः इ. स. ५७२ या सुमारास रखता तारा संपाती होती. माणजे तेव्हां विभागात्मक उत्तराषाढांच्या पहिल्या पादाच्या अंती उदगयन होत असे. वेदांगज्योतिषांत धनिष्टारंभी आहे. ह्मणजे पावण दान नक्षत्रे ह्मणजे २३ अंश २० कला अंतर आले. संपातगति ५० विकला धरून इतकें अंतर पडण्यास १६८० वर्षे लागतात. तेव्हां (१६८० - ५७२ = ) इ० स० पूर्वी ११०८ या सुमारास धनिष्ठारंभी उदगयन होत असे असें आले. परंतु हवि. भागात्मक धनिष्ठांच्या आरंभीं तें होत होते असे मानून आलें, ह्मणून ३०० वर्ष आलिकडे आलें. धनिष्ठांच्या प्रत्यक्ष दिसणान्या तारांवरून काल काढला पाहिज हे वर सांगितलेच आहे.* गणितावरून वेदांगज्योतिषाचा जो काल येतो त्याविषयी संशय घेण्यास जागाच नाही. परंतु वेदांगज्योतिषाची भाषासरणी इत्यादिकांवरून तो ग्रंथ इतका प्राचान नाहीं असें कांहीं युरोपियन पंडितांचे मत दिसते. आमच्या ग्रंथांचा काल जितका अलिकडे आणवेल तितका ते आणतात. मोक्षमल्लर एके ठिकाणी ह्मणतो कात इ. स. पूर्वी तिसऱ्या शतकांत झालें. प्रो. वेबरने तर ते इ. स. च्या ५ व्या शतकांतले असा संशय प्रकट केला आहे. तर याविषयी थोडासा विचार करू. वराहमिहिर म्हणतोः आषादिक्षिणमुत्तरमयनं रवेर्धनिष्ठाय ।। नूनं कदाचिदासीयेनोक्तं पूर्वशास्त्रेषु ॥ २ ॥ सांप्रतमयनं सवितुः कर्कटकायं मृगादितश्चान्यत् ॥ उक्ताभावो विकृतिः प्रत्यक्षपरीक्षणैर्व्यक्तिः ॥२॥ बृ. सं. अध्याय ३. आश्रेषा दासीद्यदा निवृत्तिः किलोष्णकिरणस्य ॥ युक्तमयनं तदासीत् सांप्रतमयनं पुनर्वसुतः ॥ पंचसिद्धांतिका. यांत वेदांगज्योतिषांतील अयनप्रवृत्ति सांगून वराहमिहिर ह्मणतो की, “पूर्वशास्त्रांत असें झटलें आहे." वराहमिहिराच्या लिहिण्याच्या एकंदर झोंकावरून वेदांगज्योतिष त्याच्या (शक ४२७ या ) वेळी फार जुने असे समजत होते. वराहमिहिराच्या पंचसिद्धांतिकेंत पितामहसिद्धांतांतील कांहीं गणित दिले आहे. आणि ते त्याच्या वेळी फार दिवसांचे झाल्यामुळे निरुपयोगी झाले होते असें दिसते. आणि त्याचें वेदांगज्योतिषपद्धतीशी कांहीं साम्य आहे असें दुसन्या भागांत मी दाखविले आहे. ब्रह्मगुप्त म्हणतो की, * संपातगति उत्तरोत्तर थोडथोडी वाढत आहे. इ. स. पूर्वी १४१० च्या सुमारास ती ५० विकलांहून कदाचित् कमी असेल. १८ विकला धरली तर वर लिहिलेले सर्व काल सुमारे १३५ वर्ष मागे जातील. कोलब्रूक इत्यादिकांच्या रीतीने मी काढलेल्या इ. स. पूर्वी १२०८ या कालाढून त्याणी काढलेला काल किंचित् भिन्न आहे. तो संपातगति कमजास्त मानणे आणि रेवती तारा संपाती कधी होती ह्याविषयी मतभेद यामुळे आहे.