पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सौरवर्षांचे सावनदिवस ३६६ आणि युगाचे (३६६४५= ) १८३० (यजुः । पाठ श्लोक २८ पहा). आणि युगांत सर्व नक्षत्रमंडळांत चंद्राचे फेरे ६७ होतात (यजुःपाठ श्लोक ३१ पहा). म्हणजे युगांत चंद्र ६७४२७ इतकी नक्षत्रे चालतो. एका दिवसाच्या कला ६०३ (वरील श्लोक १६ पहा). तेव्हां युगाच्या कला १८३०४६०३; तेव्हां एक नक्षत्र क्रमिण्यास चंद्रास १४२४६०३ = ६१० कला इतका म्हणजे १ दिवस ७ कला इतका काळ लागतो. सूर्यास २७ नक्षवांतून फिरण्यास ३६६ दिवस लागतात. तेव्हां एका नक्षत्रीं तो = १३५ दिवस असतो. श्रविष्ठाभ्यां गुणाभ्यस्तान्प्राग्विलनान् विनिर्दिशेत् ।। सूयान्मासान् षळभ्यस्तान् विद्याचांद्रमसान् ऋतून ॥ १९ ॥ [पूर्वार्ध दुर्बोध उत्तरार्धाचा] अर्थ-सौरमासांची सहापट करावी. ते चांद्रऋतुजाणावे. सूर्याच्या एका पर्यायांत ह्मणजे एका वर्षांत ६ ऋतु होतात. तसेंच चंद्राच्या पर्यायांत चंद्राचे ६ ऋतु होतात असे म्हटले असतां चालेल. आणि एका सौरमासांत चंद्राचा एक पर्याय झणजे ६ ऋतु होतात. तेव्हां सौरमासास ६ नी गुणिलें म्हणजे चंद्राचे ऋतु निघतील हे स्पष्टच आहे. यांत अंमळ स्थूलमान आहे. कारण वेदांगज्योतिषमते ६० सौरमासांत चंद्राचे ६७ पर्याय होतात, म्हणजे एका सौरमासांत (६x६ =) ६३. चांद्रऋतु होतात. याः पर्वभादानकलास्तासु सप्तगुणां तिथि ॥ प्रक्षिपेत् कलासमूहस्तु विद्यादादानकी: कलाः ॥२१॥ “पर्वांतींच्या भच्या (ह्मणजे नक्षत्राच्या ) ज्या आदानकला (ह्मणजे भोग्यकला) त्यांत तिथीची सातपट मिळवावी ह्मणजे [ त्या दिवसाच्या अंतींच्या ] आदानकी कला ( भोग्यकला) निघतात." प्रत्येक सावनदिवसाच्या कला ६०३ होतात. एका नक्षत्राच्या कला ६१० धरिल्या तर त्यांतल्या ६०३ एका सावनदिवसांत चंद्र चालतो, आणि ७ कला भोगावयाच्या राहतात; दुसऱ्या दिवसाच्या अंती १४ राहतात; यावरून रीति बसली. यांत तिथि ह्मणजे सावनदिवस घ्यावा लागतो ही एक अडचण आहे. यदुत्तरस्यायनतोयनं स्याच्छेषं तु यदक्षिणतोयनस्य । तदेव षष्ट्या द्विगुणं विभकं सद्वादशं स्यादिवसप्रमाणं ॥ २२ ॥ यजुःपाठः यदुत्तरस्यायनतो गतं स्याच्छेषं तथा दक्षिणतोयनस्य ॥ तदेवषष्टया द्विगुणं विभक्तं सद्वादशं स्यादिवसप्रमाणं ॥ यांत दोहोंतील “ तदेवषष्टया " याबद्दल " तदेकषष्टया " असा पाठ केलाच पाहिजे. अर्थ-उत्तरायण झाल्यापासून जे दिवस गेले असतील किंवा दक्षिणायन झाल्यापासून [अयनांत होण्यास ] जे शेष राहिले असतील, त्यांची र करून तिला एकसष्टांनी भागावे. त्यांत बारा मिळवावें. तें एक दिवस्मृतः । [मुहूर्त ] होय ॥२२॥ असा.