पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कांहीं कर्म मात्स्य नामक ऋषीनें कोणाकडून करविलें तें श्रेयस्कर झालें असें एका स्थली आले आहे (१.५.२). वर्षातील मास; मासाचे दिवस, रात्रि; मुहूर्त, प्रतिमुहूर्त यांची नांवें वगैरे वर आली आहेत (पृ. ३७, ४३, ४९, ५०). ती ज्यांत आहेत त्याच अनुवाकांत शेवटीं खालील वाक्ये आहेत. जनको ह वैदेहः ॥ अहोरात्रैः समाजगाम ।। तहोचः॥ यो वा अस्मान् वेद ॥ विजहत्पाप्मानमति ॥९॥...अभिस्वर्ग लोकं जयति ।।...अहीनाहाश्वत्थ्यः ।। सावित्रं विदांचकार ॥१०॥ सह ह सो... भूत्वा । स्वर्ग लोकमियाय | ... देवभागो ह ौतर्षः ।। सावित्रं विदांचकार॥१२॥... शूषो ह वार्णयः ॥ आदित्यन समाजगाम ।। तै. ब्रा. ३.१०. ९. वैदेह जनक अहोरात्रांबरोबर गेला. त्याला ती ह्मणालीं, जो आह्मास जाणतो तो पापरहित होतो, स्वर्गलोकास जातो. अश्वत्थाचा पुत्र अहीन हा सावित्र विद्या जाणता झाला. तो हंस होऊन स्वर्गास गेला. श्रौतर्ष देवभाग हा सावित्र विद्या जाणता झाला. वार्ष्णेय शुष आदित्याशीं संगत झाला. यांत कांहीं वेदांतशास्त्राचा संबंध आहे असे दिसते. तथापि ज्योतिःशास्त्राचा ही आहे हे पूर्वापरसंदर्भावरून अगदी स्पष्ट आहे. एकंदरीत पाहतां ज्योतिःशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र वेदकालीं झालें होतें असें अनुमान होते. वर सर्व वेदवाक्यांचा विचार एकत्रच केला आहे. तथापि ती सर्व वाक्ये एककालींच लोकांत प्रकट झाली असें नाही. तेव्हां त्यांत ज्योतिःशास्त्रसंबंधीं ज्या गोष्टी आल्या आहेत त्या एककालींच ज्ञात झाल्या असें नाहीं. कालक्रमाने हळु हळु ज्योतिर्मान वाढत गेले असले पाहिजे हे उघड आहे. आणखी एक गोष्ट लक्ष्यांत ठेविली पाहिजे की वेदांत अमुक नाही म्हणून ती ती गोष्ट त्या काली कोणास माहितच नव्हती असें अनुमान करणे बरोबर नाही. कसंहितेत ग्रहणाचा उल्लेख आहे. परंतु नक्षत्रांची नांवें सर्व आली नाहींत. तैत्तिरीय श्रुतींत नक्षत्रांचा संबंध शेंकडों स्थली आला असून त्यांत ग्रहणाचें नांवही नाही. परंतु इतक्यावरून त्या वेळी ग्रहण माहित नव्हते असे म्हटले तर ते केवळ असमंजसपणाचे होईल. याप्रमाणेच इतर गोष्टींचा विचार केला पाहिजे. शेवटी एक महत्वाचे वाक्य देऊन हे प्रकरण पुरें करितों. देवांचा दिवस. एकं वा एतदेवानामहः ।। यत्संवत्सरः ॥ तै. बा. ३. ९. २२. संवत्सर हा देवांचा एक दिवस होय." पृथ्वीवर उत्तरध्रुवस्थानी मेरूवर देव राहतात; आणि ध्रुवस्थानी ६ महिने दिवस आणि ६ महिने रात्र असते; ह्मणून संवत्सर हे देवांचे अहोरात्र असें वेदोत्तरकालीन ज्योतिषांत प्रसिद्ध आहे. ही उपपत्ति समजून येऊन वरील वाक्यांत संवत्सर हा देवांचा दिवस असें झटले आहे की काय कोणी सांगावें ! कसेंही असो, वेदोत्तरकालीनग्रंथांत युगमान अमुक वर्षे असे सांगितले आहे, त्याची उपपत्ति बरेच अंशी या वाक्यांत आहे. याविषयी जास्त विवेचन पुढे येईल.