पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वर्षारंभ.. (६८) पौष्णेन व्यवस्यति ।। मैत्रैण* कृयते ॥ वारुणेन विधृता आसते ॥ क्षेत्रपत्येन पाचयंते ॥ आदित्यनादधते ।। तै. बा. १.८.४. नक्षत्राविषयों शुभाशुभत्वाची कल्पना होती तशीच केवळ दिवसाविषयीं निराळी होती असें "अश्लील नामचित्रे॥नावस्येत् न यजेत ॥ यथा पापाहे कुरुते ।। तागेव तत् ॥' ही वाक्ये वर दिली आहेत (पृ.५६ ) त्यांवरून दिसून येते. आणि या वाक्यांवरूनच नक्षत्राचा चांगलावाईटपणा, नक्षत्राचें नांव इत्यादिकांवरून मानीत असे दिसते. दिवसाचा चांगलेपणा वाईटपणा कशावरून मानीत हे समजत नाही. नक्षत्रांची नावं पडली ती त्यांची तेजस्विता, आकति आणि कल्पित किंवा अनुभूत शुभाशुभकारित्व इत्यादिकांवरून पडली असे दिसते ( यांत थोडासा अन्योन्याश्रय येतो). वेदोत्तरकालीन ज्योतिषांतही मेष रणजे मेंढा हा सिंहास सहज वश होणारा आहे, म्हणून मेष आणि सिंह या राशीच्या वधवरांच्या विवाहासंबंधैं घटितविचार करण्याचे व त्यासारखे दुसरे बरेच नियम ह्या नामोत्पन्न अर्थाच्या धोरणानेच केलेले आहेत. वैदिककालीं वर्षारंभ कधी होत असे याचा विचार करूं. ऋग्वेदसंहितेंत सर्व ऋतूंची नांवें एकदम कोठे आली नाहीत. शरद, हेमंत, हेच शब्द संवत्सर या अर्थी पुष्कळ वेळा आले आहेत. बाकी सर्व वेदांत सर्व ऋतु जेथे जेथे आले आहेत तेथे ते वसंतादि आहेत. दोन्ही यजुवेदांत वसंत हे संवत्सराचे मुख अशा अर्थाची वाक्ये आहेत (ती वर दिलीच आहेत); मास मध्वादि आहेत ; आणि मधुमाधव हे वसंताचे मास सांगितलेले आहेत. यावरून यजुर्वेदसंहिताकाली आणि तदनुसार पुढे सर्व वैदिककाली वर्षारंभ वसंतारंभी आणि मधुमासारंभी होत असे असें निर्विवाद सिद्ध होते. व्यवहारार्थ कदाचित् कचित् वर्षारंभ इतर ऋतूंत मानीत असतील, तथापि मुख्यतः वर्षारंभ वसंताबरोबर असे असें दिसून येते. आतां महिने चांद्र होते, आणि ऋतु मुख्यतः सौरवर्षानुसार होतात. आणि एकदां चांद्रवर्षाच्या आरंभी सौरवर्षाचा आरंभ झाला तरी दोहोंमध्ये सुमारे 11 दिवसांचे अंतर असल्यामुळे प्रत्येक वर्षी चांद्रवर्षारंभीच वसंतारंभ.असें नेहमी साधणार नाही. तरी अधिकमास घालण्याची पद्धति असल्यामळे मधुमासांत केव्हां तरी वसंतारंभ होत असे; आणि मधुमासारंभाबरोबर वर्षारंभ करण्याची पद्धति यजुर्वेदसंहिताकाली आणि तदनुसार पुढेही होती यांत संशय नाही. वैदिककालच्या इतर काही गोष्टींचा विचार या ( पहिल्या) भागाच्या उपसंहारांत येईल. असो एकंदरीत वेदकाली ज्योतिःशास्त्र बरेंच स्वरूपास आले -ज्योतिःशान. होत असे दिसते. वाजसनेयिसंहितेत पुढील वाक्ये आहेत:प्रज्ञानाय नक्षत्रदर्श ॥ वा. सं. ३०.१०. यादसे गणकं ॥ वा. सं. ३०.२०. गांपैकी पहिले वाक्य तैत्तिरीयब्राह्मणांतही आले आहे ( ३.४.१). यांत गणक, दर्श हे शब्द आले आहेत. त्याप्रमाणेच या वियत प्रवीण असलेल्या ही ऋषींची नविही तैत्तिरीयब्राह्मणांत आली आहेत. काही एका शुभकाली

  • पू.५३ पहा.