पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विभाग दुसरा. वेदांगकाल. पकरण पहिलें.--वेदांगें. १. ज्योतिष. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि छंदःशास्त्र ही वेदाची सहा अंगें मानितात. सांप्रत प्रत्येक वेदाचें सूत्र (कल्प) मात्र निराळे उपलब्ध आहे, व ते त्या त्या शाखेचे वैदिक ब्राह्मण बहुधा पाठ करितात. बाकीची पांच अंगें प्रत्येक वेदाची निरनिराळी असण्याचा संभव नाहीं. पांच अंगें सांप्रत जा उपलब्ध आहेत ती ऋग्वेदी ब्राह्मण मात्र म्हणतात; बाकीच्या वेदांचे ब्राह्मण म्हणत नाहींत. सांप्रत वैदिक ब्राह्मण जें ज्योतिष म्हणतात त्याचे ३६ श्लोक आहेत; परंतु ज्यावर सोमाकराची टीका आहे असा एक वेदांगज्योतिषग्रंथ प्रसिद्ध आहे. सोमाकररुत टीकेच्या शेवटी "शेषकत यजुर्वेदांगज्योतिष" अशा अथाचे कांहीं शब्द आहेत, आणि तें व ऋग्वेदी जे म्हणतात तें यांत कांहीं भेदहा आहे. तसेंच अथर्वज्योतिष ह्मणून एक प्रसिद्ध आहे. तेव्हां मूळची हा तान वदाचा निरनिराळी ज्योतिवें असोत की नसोत, तिहींचा विचार करितांना भेद समजण्यास अडचण पडूं नये ह्मणून त्यांस निरनिराळी नांवे देणे सोईचे आहे. ऋग्वेदी ब्राह्मण जे म्हणतात त्यास आपण ऋग्वेदज्योतिष मणं आणि सोमाकराची टीका ज्यावर आहे त्यास यजुर्वेदज्योतिष ह्मणूं. अर्थवज्योतिष तर अगदीच भिन्न आहे. पहिल्या दोहोंत पुष्कळ साम्य आहे. ऋग्वेदज्योतिषांतील ३६श्लोकांपैकी ३० श्लोक यजुर्वेद ज्योतिषांत आहेत, आणि यजुर्वेदज्योतिषांत १३ श्लोक निराळे आहेत. तेव्हां एकंदर दाही मिळून म्हटले तर ४९ श्लोक होतात. दोहोंत जे श्लोक सारखे आहेत त्यांत एक श्लोक अर्थास सारखाच, परंतु शब्द आणि वृत्त यांसंबंधं पाहिले तर अगदी निराळा आहे. सोमाकर हा टीकाकार कधी झाला इत्यादि माहिती त्याजविषयी काहीच नाही. इतर कोणत्याही ग्रंथांत किंवा टीकेत त्याचे नांव आढळत नाही. त्याच्या टीकेचे दोन प्रकार आढळले. एक टीका विस्तृत आहे, तिच्या आरंभी सोमाकराने आपले नांव दिले आहे; शेवटीं शेषरुत वेदांगज्योतिष समाप्त असे म्हटले आहे. दुसरा प्रकार पहिल्याचाच संक्षेप आहे. त्यांत सोमाकराचें नांव आणि शेषरूत वगैरे कांहीं नाहीं. सोमाकराची टीका केवळ नांवाला मात्र आहे असे म्हटले असतां चालेल. जे श्लोक अगदी सोपे आहेत व ज्यांत गणिताचा भाग बहुधा नाही ते सोडून दिले तर सोमाकरास ग्रंथ मुळीच लागला नव्हता असें ह्मणण्यास चिंता नाही. आमच्या दुसन्या ज्योतिषांपैकी कोणीच वेदांगज्योतिषाचा विचार गणितदृष्टया केलेला दिसत नाही. वेदांगज्योतिषाचा इतर ज्योतिषग्रंथांशी फारसा मेळ नाही, यामुळे याचा संबंध बहुधा कोठेच आला नाही असे दिसते. कचित् कांहीं