पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६४) "हे महाप्रबल पांच [ देव ] विस्तीर्ण लोकाच्या मध्ये असतात ते मी देवाविषभी स्तोत्र रचितों त्याप्रत सर्व एकदम येणारे असतांही [आज ] सर्व निघून गेले आहेत......" ह्यांत देव शब्द प्रत्यक्ष नाहीं, तरी पर्वापर संदर्भावरून तो विवक्षित आहे याविषयी संशय नाही. "एकदम येणारे " असें मटले आहे. भोमादि पांच ग्रह एकदम एकत्र सगळे आकाशांत दिसतात असे फार क्वचित् होते. तसेच रात्री आकाशाच्या मध्यभागी बुधशुक्र कधीच दिसावयाचे नाहीत. तरी “दिवः मध्ये " याचा अर्थ "आकाशांत " एवढाच आहे असें ह्मणतां येईल आणि राजीत केव्हां तरी सर्व ग्रह दिसतात असें, एकादा ग्रह अस्तंगत असेल. तेव्हां खेरीजकरून नेहमी होते. वेदांतले मूळचे देव मटले झणजे सृष्टचमत्कार, प्रत्यक्ष दिसणारी तेजें अशा प्रकारचेच होत. देव शब्दाचा धात्वर्थही प्रकाशणारा असा आहे. दोन देव ह्मणजे आश्विन, ३३ देव ह्मणजे द्वादशादित्यादि, तसे पंचदेव निराळे प्रसिद्ध नाहींत. पंचदेव हा शब्द ऋक्संहितेंत दुसरे ठिकाणीही (१०. ५५. ३) आला आहे. तेव्हां पंचदेव मणजे ग्रह असें ह्मणतां येईल. नक्षत्रे ही देवांची गृहे असे वर आले आहे (पृ. ५६) त्यावरूनही या ह्मणण्यास बळकटी येते. आणि त्याच वाक्यावरून ग्रहांचे ज्ञान वैदिक काली होते असे दिसून येते. आमच्यांतील आबालवृद्धांस गुरुशुक्रांची त्यांत विशेषतः शुक्राची ओळख असते. तो कधी पहांटेस पूर्वेस बरेच दिवस दिसतो, कधी सायंकाळी पश्चिमेस दिसतो. सुमारे प्रति २० महिन्यांत ९ महिने शुक्र पहांटेस पूर्वेस दिसतो. उषःकालापूर्वी जागृत होऊन स्नान करून यजन करूं लागणान्या आमच्या प्राचीन ऋषींस दर २० महिन्यांत ८९ महिने पूर्वेस दिसणारे आणि बाकी महिन्यांत पूर्वेस न दिसणारे, आकाशाकडे पाहिले असतां ज्याकडे लक्ष्य जावयाचेंच असें शुक्रासारखे तेज आश्चर्यानंदजनक झाले नसेल, आणि इतर तारांपेक्षा या तेजाची गति कांहीं निराळी आहे (म्हणजे ज्योतिःशास्त्राच्या भाषेनें हा ग्रह आहे) असे त्यांच्या लक्ष्यांत आले नसेल, हे अगदी संभवनीय दिसत नाही. प्राचीनतम वेदसूक्ते ज्या काली झाली त्या कालींच ही गोष्ट त्यांच्या लक्ष्यांत येऊन गुरुशुक्रांच्या ठायीं त्यांपणी देवत्व कल्पिलें. अश्विनौ म्हणून जें देवताद्वय वेदांत प्रसिद्ध आहे त्याची मूळ कल्पना गुरुशुक्रांवरून उद्भवली अशी माझी कल्पना आहे. प्रति २० महिन्यांत ९ मा हेने पहांटेस पूर्वेस शुक्र दिसतो. त्यांत बहुधा प्रत्येक खेपेस सुमारे २, ३ महिने गुरु त्याच्या जवळ असतो. त्यांत काही दिवस तर फारच जवळ असतो. पुढे शुकाची गति जास्त असल्यामुळे गुरु त्याच्या मागे म्हणजे पश्चिमेस राहून उत्तरोत्तर शुक्रा च्या अगोदर उगवू लागतो. व काही दिवसांनी शुक्र पहांटेस उगवत आहे तों गुरु पछिमेस अस्त पावण्याच्या सुमारास जातो. म्हणजे त्याणे सगळ्या* आ

  • (पुस्तकाचा हा भाग प्रथम ता. ३० डिसेंबर १८८७ रोजी लिहिला, तेव्हां ही टीप लिहिलेली आहे ) गेल्या सपटंबरच्या २६ व्या तारखेस शुक्राचा उदय पूर्वेस झाला आणि २१ नव्हंबर रोजी गुरूचा पूर्वेस उदय झाला. मणजे २२ नवंबर पासून ते दोघे एकदम पहांटेस पूर्वेस दिसं लागले. हल्ली २, ३ दिवस ते फार जवळ जवळ दिसत आहेत. आणखी एकदोन दिवशी ता. २ जानआरी १८८८ रोजी ते परम सन्निध येतील. झणजे त्यांची युति होईल. ता. जूनच्या सुमारास शुक्र पूर्वेस उगवत आहे तो गुरु पश्चिमेस मावळण्यास गेलेला दिसल. आणि त्याच सुमारास

(पुढे चाल.)