पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काशाचें कमण केलेले दिसते. गुरु आणि शुक्र एकत्र आहेत अशा वेळी त्यांविषयी आश्विनत्वाची कल्पना झाली असावी, आणि पुढे त्यांपैकी एक (शुक्र) नेहमी सूर्याजवळ असतो आणि दुसरा (गुरु) सर्व आकाशांत फिरतो हे पाहून पुढील कल्पना झाली असावीः-- ईर्मान्यद्वपुषे वपुश्चक्रं रथस्य येमथः । पर्यन्या नाहषा युगा मह्ना रजांसि दीययः ॥ क्र.सं. ५. ७३. ३. हे अश्वीहो, तुम्ही आपल्या रथाचें एक तेजस्वी चक सूर्याच्या ठिकाणी त्याच्या शोभेकरितां नियमित करिते झालां [आणि ] दुसन्या चक्रानें...तुम्ही...लोकांभोंवती फिरतां. यांत एक "तेजस्वी चक्र सूर्याच्या ठायीं ठेविते झालां" हे शुक्राकडे फार उत्तम रीतीने लागते; आणि “ दुसऱ्या चक्राने भुवनाभोवती फिरतां" हे गुरूकडे चांगले लागते. निरुक्तांत युस्थानीय देवतांत अश्विनांची गणना आहे. त्यांचा काल ( म्हणजे त्यांची स्तुत्यादि करण्याचा काल ) अर्धरात्रानंतर सांगितला आहे. ऋग्वेदांत आश्विनसूक्तांत उषेचा काहींना काही तरी संबंध येतो; आणि आपले ऋषि म्हणजे उषःकाली जागृत होणारे; त्यांचे लक्ष्य त्या वेळी आकाशाकडे जाणारच. या गोष्टींवरून वरील कल्पनेस बळकटी येते. एकंदर विचार पाहतां मूळचे अश्विनौ म्हणजे गुरुशुक्र असे मला निःसंशय वाटते. बृहस्पतीच्या महत्वाविषयीं स्वतंत्रही कल्पना आढळते. बृहस्पतिः प्रथमं जायमानो महो ज्योतिषः परमे व्योमन् ॥ क. सं. ४. ५०.४. अथ. सं. २०.८८.४. "बृहस्पति प्रथम महान् प्रकाशाच्या अत्यंत उंच स्वर्गी उत्पन्न झाला." तैत्तिरीयवाह्मणांत देखील हे वाक्य आले आहे (२.८.२.). यांत बृहस्पति हा तारारूपी देव ही कल्पना आहे असे दिसतें. तैत्तिरीयब्राह्मणांत आणखी पुढील वाक्य आहे. बृहस्पतिः प्रथमं जायमानः ।। तिव्यं नक्षत्रमभिसंबभूव ॥ तै. बा.३.1.1. "वृहस्पति प्रथम उत्पन्न झाला तो तिष्य नक्षत्राजवळ झाला." गुरूचा परमशर सुमारे १ अंश ३० कला होतो. यामुळे २७ नक्षत्रांपैकी ज्यांशी बृहस्पतीची निकटयुति होण्याचा संभव आहे अशी फक्त पुष्य, मघा, विशाखा (आल्फालिबा), अनुराधा, शतभिषक आणि रेवती ही ६ नक्षत्रे आहेत. गुरु आणि पुष्यनक्षत्राची योगतारा ही दोन्ही मिळून एकच दिसतात इतकी निकटयुति दोघांची कधी कधी होते. अशी युति होऊन मग काही वेळाने गुरु निराळा दिसु लागण्याच्या वेळी पुष्य नक्षत्राजवळ गुरु जन्मला अशी कल्पना झाली असावी. अर्थात् त्या वेळी त्याच्या गतीचे म्हणजे त्याच्या ग्रहत्वाचें ज्ञान झाले असले पाहिजे. तिष्यनक्षत्राची देवता बृहस्पति आहे. सांप्रत देखील गुरु पुष्ययोग फार उत्तम मानितात. (मागील पानावरून पुढे चालू) शक्राचा पूर्वेस अस्त होईल. ज्याला ज्योतिषाची काही माहिती नाही अशा एका गृहस्थानें काल पहांटम आपण होऊन मला दाखविलें की हे पहा दोन ग्रह जवळ जवळ दिसत आहेत. तर याप्रमामेंच अशा स्थितीत गुरु शुक्रांकडे आमच्या प्राचीन ऋषींचें लक्ष्य गले नसेल हे अगदीं संभवत नाहीं.