पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एका मनुष्याच्या आयुष्यात एकदोन वेळाच घडणारी आहे. वरील ऋचातील वर्णन खग्रास सूर्यग्रहणास अनुलक्षून आहे हे स्पष्ट आहे. असे असून ते अत्याश्चर्य किंवा अतिभीति यांणी भरलेले नाही. यावरून त्या कालीं ग्रहणाचा बराच परिचय होऊन त्यासंबंधे भीति बरीच उडाली होती असे दिसते. दुसरी गोष्ट "अत्रि मात्र सूर्यास मिळविते झाले इतर कोणी मिळवू शकले नाहीत " याचा अर्थ काय ? अत्रिकुलांतल्या पुरुषास मात्र त्यावेळी सूर्यग्रहणाचें ज्ञान होते, इतरांस नव्हतें असें यावरून दिसते. आणि इतरांस ज्ञान नव्हतें ह्मणजे काय ? ग्रहण लागले आहे हे एखाद्या पोरास देखील समजेल; असे असून अत्रि मात्र सूर्यास सोडविण्यास समर्थ झाला असे म्हटले आहे. यावरून ग्रहण केव्हां सुटेल हे अत्रीला माहीत होते; म्हणजे ग्रहणासंबंधे ज्ञान अत्रीला होते तसे इतरांस नव्हतें असें दिसते. यावरून ग्रहणस्पर्शमोक्षकाल सूक्ष्मपणे सांगण्याइतके सूक्ष्मज्ञान नसले तरी ६५८६ दिवसांनी म्हणजे २२३ चांद्रमासांनी तीच तीच ग्रहणे पुन्हा होतात असें प्राचीन खाल्डिअन लोकांस माहित होते असे म्हणतात, तशा प्रकारचे तरी ज्ञान अत्रिकुलांतील पुरुषांस असेल असे दिसते. तिसरी गोष्ट स्वर्भानु सूर्यास न गिळो असें वरील ऋचांत एकदां आले आहे, तरी तो तमाने सूर्यास आच्छादिता झाला असें तीनचार वेळा म्हटले आहे. म्हणजे स्वर्भानु निराळा आणि तम निराळे असें झालें. अमावास्येच्या दिवशी सूर्यामध्ये चंद्र प्रवेश करितो असें ऐतरेयब्राह्मणांतलें वाक्य वर दिले आहे (पृ. ४६), त्यावरून सूर्यग्रहणाचे खरे कारण वर वर्णिलेल्या ग्रहणकालीं कदाचित् माहित नसले, तरी त्या वेळच्या लोकांच्या समजुतीवरून त्या समजुतीचा कल खन्या कारणाकडे जाण्याचा होता असे म्हणण्यास हरकत नाहीं. चंद्रसूर्यास स्वर्भानु गिळतो ही कल्पना मागाहून प्रबल झाली असावी. तांड्यब्राह्मणांत पांच ठिकाणी (४. ५. २, ४. ६ १३, ६. ६.८; १४. ११. १४,१५; २३.१६.२) ग्रहणाचा उल्लेख आहे. त्यांत स्वभानने सूर्यास तमाने वधिले असें वर्णन आहे. पांचांपैकी दोन स्थली (६.६,८:१४.११.१४, १५) अत्रीने भासाने (तेजानें ) अंधकार नाहींसा केला असें मटले आहे. बाकी तीन स्थली देवांनीं तम नाहींसें केलें असें मटले आहे. परंतु तेथेही 'देव' ह्मणजे - र्यरश्मि असा अर्थ दिसतो. गोपथ ब्राह्मणांत (८.१९) स्वर्भानूनें सूर्यास तम ने वधिलें, अत्रीने त्याचा अपनोद केला, असें वर्णन आहे. शतपथब्राह्मणांत (५. ३. २. २) स्वर्भानूने सूर्यास तमाने वेधिलें, सोम आणि रुद्र यांणी ते तम नाहींसें केलें, असें वर्णन आहे. आतां ग्रहांविषयीं वेदांत काय आहे हे पाहूं. नवग्रहांपैकी रविचंद्रांचा उलेख वेदांत शेंकडों ठिकाणी आला आहे हे सांगावयास नकोच. ग्रह. राहुकेतु हे ग्रह दृश्य नाहीतच. तेव्हां बाकी राहिलेले भौमादि पांच ग्रह हेच वास्तविक सूर्यमालेतील ग्रह होत. परंतु ज्यांत या पांचांविषयी किंवा त्यांतील कांहींविषयी संबंध आला आहे असें अगदी स्पष्टपणे दिसून येईल अशी वाक्ये वेदांत कोठे मला आढळली नाहीत; तथापि अनुमान करण्यास बरीच जागा आहे. अमी ये पंचोक्षणो मध्ये तस्थुमहो दिवः ॥ देवत्रा नु प्रवाच्यं सनीचीना नि वावृतार्वनं मे अस्य रोदसी ॥ क. सं.१.१०५.१०.