पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रहणे. हिरण्ययी नौरचरद्धिरण्यंबधना दिवि ।। तत्रामृतस्य पुष्य देवाः कष्टमयन्वत ॥ ___अथ. सं. ५. ४. ४, ६.९५. २. या अथर्वसंहितेतील मंत्रांतही आकाशांतील सुवर्णनौका आली आहे. या मंबांतील पुष्य शब्दाचा संबंध पुष्यनक्षत्राशी दिसतो. पुनर्वसु आणि पुष्य यांच्या दक्षिणेकडील जवळच्याच एका तारकापुंजास Navis (नौ) असें नांव युरोपिअन ज्योतिषांत आहे. हीच वेदांतली नौ असावी असे दिसते. आतां वेदांत ज्योतिषसंबंधे दुसऱ्या गोष्टी काय आल्या आहेत हे पाहूं. ग्रहणाचा निर्देश ऋक्संहितेत पुढे लिहिल्याप्रमाणे आला आहे. यत्वा सूर्य स्वर्भानुस्तमसाविध्यदासुरः ॥ अक्षेत्रविद्यथामुन्धो भुवनान्यदीधयुः ॥ ५ ॥ स्वर्भानोरधदिद्र मायाऽअवो दिवो वर्तमाना अवाहन । गूल्हं सूर्य तमसापव्रतेन तरायेण ब्रह्मणाऽविंददत्रिः ॥ ६॥ मामामिमं तव संतमत्र इरस्या दुग्धो भियसा निगारीत् ।। त्वं मित्रो असि सत्यराधास्ती मेहावतं वरुणश्च राजा ।। ७॥ ग्राव्णो ब्रह्मा युयुजानः सपर्यन् कीरिणा देवान्नमसोपशिक्षन ।। अत्रिः सूर्यस्य दिवि चक्षुराधात् स्वर्भानोरपमाया अघुक्षत् ॥ ८ ॥ यं वै सूर्य स्वर्भानुस्तमसा विध्यदासुरः ।। अत्रयस्तमन्वविंदना रन्ये अशकुवन् ॥ ९॥ म. सं. ५. ४०. हे सूर्या, जेव्हां आसुर स्वर्भानु तमाने तुला आच्छादिता झाला तेव्हां सर्व भुवन अशी दिसली की [ तेथील ] सर्वजन [आपआपलें] स्थान न जाणणारा मुख झालला आहे. ।। ५॥ द्यूच्याखाली असणाऱ्या ज्या स्वर्भानच्या माया त्यांचा, ह ३२) तू नाश करितोस. अपवत तमानें झांकलेल्या सूर्यास अत्रि तुरीयब्रह्माने मिलावता झाला. ॥ ६॥ हे अत्रे या [ अवस्थेप्रत प्राप्त झालेल्या ] मला...अन्नाच्या इच्छनद्राह करणारा तो असुर भयोत्पादक अंधकाराने न गिळो. तूं मित्र आहस आणि सत्यधन आहेस. तूं आणि वरुण दोघे माझें एथे रक्षण करा ॥ ७ ॥ आत्र बामणाव्याची योजना करून (देवांकरितां सोम काढन ) आणि याप्रमाण सामानवाचा पूजा करून आणि नमस्कार करून स्वर्भानच्या माया निवारिता झा आणि वयाच्या प्रकाशाच्या ठायीं[आपला ] डोळा ठेविता झाला ( सूर्य निसमस्क झाला असे पाहता झाला )* ॥८॥ ज्या सूर्याला आसुर स्वर्भानु तमान आच्छादिता झाला त्या सूर्याला अत्रि मिळविते झाले. इतर कोणी मिळवू शकल नाहींत ।। ९ ।। या वर्णनात दोनतीन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली ही की ग्रहणाचें हें जें वर्णन आहे ते अतिभीतिदर्शक नाही. सूर्यग्रहणे पुष्कळ होतात, परंतु स्थलविशेषी त्यापका थोडीच दिसतात. त्यांतही खग्रास सूर्यग्रहण फार थोडे वेळा हात. इलडात ३. स. ११४० च्या मार्चच्या २० व्या तारखेस खग्रास सूर्यग्रहण झाले होते. त्यावर पुनः इ. स. १७१५ अप्रीलच्या २२ व्या तारखेस झाले. ह्मणज मध्य ५७५ वर्षांत खग्रास सूर्यग्रहण पडले नाही. हिंदुस्थानांत खग्रास सूर्यग्रहणावांचून इतका काल कधी जाण्याचा संभव नाही. तरी ती गोष्ट

  • सायणांनी तिसऱ्या पादाचा दसरा एक अर्थ दिला आहे आणि ऋचेच्या इतर भागाचाही त्यांचा अर्थ किंचित् भिन्न आहे.