पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६१) अमी य ऋक्षा निहितास उच्चा न दवे कह चिदिवेयुः ॥ क्र. सं. १. २४.१०. हे जे क्ष* [आकाशाच्या ] उच्च प्रदेशी ठेविलेले रात्रीस दिसतात ते दिवसास कोठे तरी जात असतात." शतपथब्राम्हणांत म्हटले आहे:-- सप्तर्षीन ह स्म वै पुरा इत्याचक्षते ॥ शत. बा.२.१.२.४. "प्राचीनकाळी सप्तर्षीस 'ऋक्ष ' असें म्हणत असत." उर्वः सप्त ऋषीनुपतिष्ठस्व ॥ तांड्य बा.१.५.५. यांतही सप्तर्षांचा उल्लेख आहे. तैत्तिरीयब्राह्मणांत एके स्थली कृत्तिकादि कांहीं नक्षत्रांवर अग्न्याधान करावें असे सांगितल्यावर पुढे चित्रा नक्षत्राचा संबंध आला आहे, त्यांत अशी वाक्ये आहेत. कालकंजा वै नामासुरा आसन् । ते सुवर्गाय लोकायाग्निमचिन्वत ।। पुरुष इष्टकामपादधात् पुरुष इष्टकाम् ।। स इंद्रो ब्राह्मणो वाण इष्टकामपाधत्त । एषा मे चित्रानामेति ॥ ते सुवर्ग लोकमाप्रारोहन् । स इंद्र इष्टकामावृहत् ॥ तेवाकीर्यत ॥ येवाकीर्यन्त ॥ त उणोंवभयोभवनू ॥ द्वावदपततां ॥ तौ दिव्यौ श्वानावभवतां ॥ तै. ब्रा. १.१.२. यांतील “दोन वर गेले ते दिव्य श्वान झाले " हा निर्देश कोणत्या तरी दोन तारांस किंवा तारकापुंजांस अनुलक्षून आहे असे स्पष्ट दिसते. शुनो दिव्यस्य यन्महस्तेना ते हविषा विधेम ॥ २ ॥ ये त्रयः कालकंजा दिवि देवा इव श्रिताः ॥ तान्सर्वानव्ह ऊतये ।। अथ. सं. ६.८०. ह्यांत एक दिव्य (आकाशांतला ) श्वा आला आहे आणि आकाशांत देवासारखे असलेले तीन कालकंजे आले आहेत. यौ ते श्वानौ यम रक्षितारौ चतुरक्षौ पथिरक्षी नृचक्षसौ क. सं. १०.१४.११. यांत दोन श्वान आले आहेत. अथर्वसंहितेंतही हा मंत्र " यौ० पथिषदी नृचक्षसा" असा आला आहे (१८.२.१२). मृगनक्षत्राच्या पूर्वेस आकाशगंगेच्या दोहों बाजूंस दोन तारकापुंज आहेत त्यांस युरोपियन ज्योतिषांत Canis Major (बृहल्लब्धक ) आणि Canis Minor (लघुलुब्धक ) अशी नावे आहेत. पहिल्यांत लुब्धक (व्याध ) ही मोठी तारा आहे. दुसांत पुनर्वसुंतल्या चार तारांपैकी दक्षिणच्या दोन तारा आहेत. हे दोन पुंज हेच वेदांतले दोन श्वान होत असे दिसते. दैवीं नावं स्वरित्रामनागसमखवंतीमारुहेमा स्वस्तये ॥ क्र. सं. १०. ६३. १०. या ऋचेत आकाशांतील नौका आली आहे. अथर्वसंहितेंतही हा मंत्र 'दैवीं गसो अस्त्र० ' असा आला आहे (७.६.३). * युरोपिअन ज्योतिषांत सप्तर्षि या नक्षत्रपुंजास ऋक्ष (आस्वल ) या अर्थाचंच नांव आहे.