पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- यांत फल्गुनी या अर्थी अर्जुनी आणि मघा यांबद्दल अघा शब्द आहे. वेदोत्तरकालीन ज्योतिषग्रंथांत हे शब्द बहुधा आढळत नाहींत. तथापि ते त्या नक्षत्रांचे वाचक आहेत याविषयी संशय नाही. कारण अथर्वसंहितेत हीच ऋचा अशी आली आहे :सूर्याया वहतः प्रागात्सवितायमवासृजत् ॥ मघास हन्यते गावः फल्गुनीषु व्युह्यते ॥ अथ.सं. १४.१.१३. हीत मघा आणि फल्गुनी असेच शब्द आहेत. तसेंच एता वा इंद्रनक्षत्रं यत्फल्गुन्योप्यस्य प्रतिनाम्न्योर्जुनो हवै नामेंद्रो यदस्य गुह्यं नामार्जुन्यो वै नामैतास्ताः शत. बा. २. १. २.११. यावरून अर्जुनी झणजे फल्गुनी हे स्पष्ट आहे. यजुर्वेदांत “मघासु" असा बहुबचनी स्त्रीलिंगी प्रयोग येत असतो. त्याप्रमाणेच येथे " अघासु" हा प्रयोग आहे. तसेंच “फल्गुन्योः" असा स्त्रीलिंगी द्विवचनी प्रयोग येत असतो, तसाच “अर्जुन्योः " हा आहे. मघा आणि फल्गुनी हा जो नक्षत्रानुक्रम त्या क्रमानेच एकामागून एक होणाऱ्या दोन क्रिया या नक्षत्रांवर सांगितल्या आहेत. हा अनुक्रम आणि अघासु आणि फल्गुन्योः या शब्दांचे लिंग आणि वचन ह्या गोष्टी तैत्तिरीय वेदांतील नक्षत्रांशी व वेदोत्तरकालीन ज्योतिषग्रंथांशी मिळतात. यावरून यजुर्वेदांतील नक्षत्रपद्धति ऋग्वेदकाली पूर्णपणे प्रवृत्तीत होती असें निःसंशय सिद्ध होते. चंद्रमागांतील तारका आणि इतर तारा यांस अभेदेंकरून एकच शब्द ऋक्संहितेंत लाविलेला आहे असें वर सांगितले, परंतु तैत्तिरीयसंहितेत त्या दोहोंत भेद केलेला एका स्थली आढळतो. मेध्य अश्वाचे वर्णन केले आहे त्यांत खालील वाक्ये आहेत. यो वा अश्वस्य मेध्यस्य शिरो वेद शीर्षण्वान्मेध्यो भवत्युषा वा अश्वस्य मेध्यस्य शिरः सूर्यचक्षुर्वातः प्राणचंद्रमाः श्रोत्रं दिशः पादा अवांतर दिशाः पर्शवोऽहोरात्रे निमेषोर्धमासाः पर्वाणि मासाः संधानान्तवाऽगानि संवत्सर आत्मा रश्मयः केशा नक्षत्राणि रूपं तारका अस्थानि नभो मासानि...।। तै. सं. ७. ५. २५. मेध्य अश्वाचे शिर जो जाणतो तो शीर्षण्वान् आणि पवित्र होतो. उषा हे मेध्य अश्वाचे शिर, सूर्य चक्षु, वात प्राण, चंद्रमा कर्ण, दिशा पाय, अवांतर दिशा पशु, अहोरात्र निमेष, अर्धमास पर्वे, मास ही संधानें, ऋतु अंगें, संवत्सर हा आत्मा, रश्मि केश, नक्षत्रे रूप, तारका अस्थि. तैत्तिरीय श्रुतीत नक्षत्रांचा संबंध फार आला आहे. कोठे सर्व नक्षत्रांची नांवें व त्यांच्या देवता सांगितल्या आहेत. कोठे त्यांविषयी इतर पुष्कळ प्रकारचे वर्णन आहे. कोठे नक्षत्रांच्या संज्ञांची व्यत्पत्ति दिली आहे. कोठे मधली मधलींच कांही नक्षत्र कारणवशात् आली आहेत. तैत्तिरीयसंहितेत खालील अनुवाकांत सर्व नक्षत्रे आली आहेत.

  • यासंबंधे पुढील (पृ० ५३) "अर्यम्णः पूर्वे फल्गुनी ।। जाया परस्तादृषभोवरन ॥भगस्योत्तरे ।। वहतवः परस्ताद्ब्रह्माना अवस्तात् ॥” ही वाक्ये लक्ष्यांत आणण्यासारखी ३