पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आकाशांत इतस्ततः सर्वत्र ज्या तारा पसरलेल्या दिसतात त्या सर्वांस अनुलक्षून असलेली झणजे नक्षत्राविशेषांविषयी नव्हत अशी वाक्ये ऋग्वेदसंहितेंत आहेत त्यांपैकी काही खाली लिहितो. यांतले कांहीं मंत्र अथर्वसंहितेतही आहेत. अप त्ये तावयो यथा नक्षत्रा यंत्यक्तभिः ॥ सूराय विश्वचक्षसे ।। ___ क्र. सं. १. ५०. २. अथ. सं. १३. २. १७, २०४७.१४. विश्वदर्शी सूर्य आल्याबरोबर चोरांप्रमाणे नक्षत्रे आणि रात्र पळून जातात. अभि श्यावं न कृशनेभिरश्वं नक्षत्रभिः पितरो द्यामापंशन् । ऋ.सं.१०.६८.११. या दोन वाक्यांत तारकांस नक्षत्र ही संज्ञा लाविलेली आहे. यौरिव स्मयमानो नभोभिः ॥ यांत तारका याअर्थी नभः हा शब्द योजिला आहे. कांहीं स्थली तारका याअर्थी रोचना हा शब्द आला आहे. द्यावो न स्तृभिश्चितयंत ॥ क. सं. २. ३४. २. ऋतावानं विचेतसं पश्यंतो यामिव स्तृभिः ॥ क्र.सं. ४. ७. ३. ह्या दोन मंत्रांत तारा या अर्थी “स्तृ " हा शब्द आला आहे. यांत पहिल्या दोन ऋचांत नक्षत्र हा शब्द सर्व तारकांस लाविलेला आहे. चंद्रमागांतील तेवढी नक्षत्रे अशा अर्थी लाविलेला नाही. वेदोत्तरकालीन संस्कृत ग्रंथांत देखील नक्षत्र संज्ञा चंद्रमार्गातील नक्षत्रांस लागून सर्व तारकांस देखील लागते. ___अथो नक्षत्राणामेषामुपस्थे सोम आहितः ।। क्र.सं. १०.८५. २. अथ. सं. १४. १. २. नक्षत्रांमध्ये सोम ठेविला आहे. यांत नक्षत्र शब्द चंद्रमार्गातील नक्षत्रांसच लाविलेला दिसतो. चंद्रमार्गातील २७ नक्षत्रांपैकी सर्वांची नांवें ऋक्संहितेत आली नाहीत. काहींची मात्र आली आहेत. ५. ५४. १३, १०. ६४. ८ यांत 'तिष्य' शब्द आहे, तो 'पुष्य नक्षत्रवाचक असावा. ४. ५१. २, यांत 'चित्रा' नक्षत्र आहे. ४. ५१४७ यांत 'रेवती' शब्द आहे, तो रेवती नक्षत्र या अर्थीच दिसतो. पुढील कारें क्रमाने दोन नक्षत्रे आहेत. सूर्याया वहतः प्रागात् सवितायमवासृजत् ।। अघास हन्यते गावोर्जुन्योः पर्युह्यते ॥ क्र.सं. १०.८५. १३. सविता जे [आंदण ] देता झाला तें आंदण सूर्येच्या अगोदरच पुढे गेलें [ मघा ] नक्षत्री गाईंस *हाणतात. अर्जुनी (फल्गुनी ) नक्षत्री [ कन्या ] ने सूर्या नांवाची सवित्याची कन्या सोमाला दिली, तेव्हां सूर्याने ज्या गार्ड और दिल्या त्या आदल्या दिवशीच ह्मणजे मघा नक्षत्री हांकून नेल्या आणि अर्जुनी नक्षत्रावर नेली, या कथेस अनुलक्षून ही ऋचा आहे.. _* "हन्यातूचा अर्थ या स्थली ठार मारणे असा नाही. हाणणे हा शब्द ताडणें रून हॉलीसवणे, या अर्थी सोलापूर प्रांती सांप्रत देखील अतिशय प्रचारांत आहे.