पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४५) १२ असे दिसून येते. वर्षांत त्या १२ म्हटल्या आहेत, २४ नाहीत. यावरून शुक्ल कृष्ण यांपैकी कोणत्या तरी एका पक्षांतल्या ८ व्या रात्रीला अष्टका हें नांव आहे असे दिसते. वरील वाक्यांत पूर्णिमेनंतर अष्टका आली आहे. पौर्णमास्यष्टकामावास्या ॥ तै. बा. ३. ११. १. १९. यांतही (पृ. १७ पहा ) पूर्णिमेनंतर अष्टका आहे. यावरून कृष्णपक्षांतली आठवी रात्र ती अष्टका असे दिसते. आश्वलायनादि सूत्रांत रुष्णपक्षांत अष्टका असें स्पष्ट आहे. द्वादश पौर्णमास्यो द्वादशैकाष्टका द्वादशामावास्याः ॥ तांड्य बा. १०.३.११. यांत कृष्णाष्टमीला 'एकाष्टका' अशी संज्ञा आली आहे. आपस्तंबसूत्रांत माघी पूर्णिमेनंतरच्या अष्टमीस 'एकाष्टका ) म्हटले आहे. व्यष्टका, पौर्णमास्यां पूर्वमहर्भवति ॥ व्यष्टकायामुत्तरं ॥ ... उदृष्ट, अमावास्यायां पूर्वमहर्भवति ॥ उदृष्ट उत्तरं ॥ तै, बा. १.८.१०.२. तांड्यब्राह्मणांतही (१८.११.८) ही वाक्ये आहेत. यांत रुष्ण प्रतिपदेला व्यष्टका ' आणि शुक्ल प्रतिपदेला 'उदृष्ट ? अशा संज्ञा आहेत. चंद्राच्या कला वृद्धिक्षय पावतात ह्याचे कारण त्याचे प्राशन देव करितात, ही चंद्रकला. कल्पना वेदांत आढळते. यत्वा देव प्रपिबंति तत आप्यायसे पुनः॥ वायुः सोमस्य रक्षिता समानां मास आकृति क्र. सं. १०.८५. ५. "हे देवा [सोमा ] तुझें प्राशन करितात. नंतर तूं पुनः तेजस्वी होतोस सोमाचा रक्षक आहे. समांचा (संवत्सरांचा) आणि मासांचा तूं करणारा आहे निरुक्तांत ही ऋचा सोमवल्लीपर आणि चंद्रपरही लाविली आहे. यमादित्या अशुमायाययति यमक्षितमक्षितयः पिबंति ॥ तै. सं. २. ४. १४. यांत चंद्राला आदित्य तेजस्वी करितात आणि तो पूर्ण झाल्यावर त्याने करितात असें झटले आहे. यांत 'आदित्याः ' असा बहुवचनीं प्रयोग आहे, थम द्वादशादित्यांस अनुलक्षून असावा. ह्मणजे सूर्यच चंद्राच्या कलांची वाम णि क्षय करितो अशी समजूत प्रथम असून मागाहून आदित्य शब्द सर्व वाचक असल्यामुळे देव चंद्रकला प्राशन करितात अशी समजूत झाली असा चंद्रास सूर्यापासून प्रकाश मिळतो असें स्पष्टपणे पाय चंद्रप्रकाश. क्यांत आहे. सूर्यरश्मिभंद्रमा गंधर्वः ।। तै. सं. ३. ४. ७.१. प्राप्त होतात असा झ यांत चंद्र हा सूर्यरश्मि अर्थात् ज्यास सूर्यापासून किरण प्राप्त होतात अ टला आहे.