पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहेत, आणि तिथि शब्द मुळीच आला नाही. तेव्हां ती तिथि शब्दाची विशेषणे संभवतच नाहीत. चांद्रमासाचा ३० वा भाग किंवा सूर्यचंद्रांमध्ये १२ अंश अंतर पडण्यास लाग णारा काळ याअर्थी तिथि शब्द वेदांत कोठे मला आढळतिथि. ला नाही. महिना चांद्र असला तरी तो सुमारे २९॥ सावनदिवसांचा असल्यामुळे त्याचा ३० वा भाग दिवसाहून कमी होणार. स्पष्ट सूर्य आणि चंद्र यांसंबंधे तिथि कधीं सावनदिवसाहून कमी होते, कधी जास्त होते. तरी सरासरीने तिथीचें मान सावनदिवसाहून कमी होते. व तें मोजण्यास स्वाभाविक सुलभ साधन नाही. यामुळे सांप्रतच्या स्पष्ट किंवा मध्यम या दोनही अर्थांची तिथि वेदांत नाही. तिथि हा शब्द बढचब्राम्हणांत एकदोन स्थलीं आला आहे, त्यांत एके ठिकाणी तिथीचे लक्षण असें आहे. यां पर्यस्तमियादभ्युदियादिति सा तिथिः ॥ ऐ. बा. ३२. १०. "जिच्या ठायीं [चंद्र ] अस्त पावतो आणि उगवतो ती तिथि." चंद्राच्या एका उदयापासून दुसन्या उदयापर्यंत एका सावनदिवसाहून सुमारे एक मुहूर्त जास्त इतका काळ जातो. चांद्रमासांत सूर्याचे उदय कधी २९ होतात, कधा २० होतात. आणि चंद्राचे त्यांहून एक कमी इतके म्हणजे २८ किंवा २९ होतात. तेव्हां तिथीचे वरील वाक्यांतलें लक्षण घेतले तर चांद्रमासांत ३० तिथि कधाच यावयाच्या नाहीत. हे लक्षण इतर वेदांत किंवा वेदोत्तरकालीन ग्रंथांत कोठे आढळत नाहीं. यावरून ते फार प्रचारांत नसावें. कदाचिन वरील वाक्याचा भावार्थ निराळा असेल. कसेही असले तरी ज्योतिषग्रंथांतल्या अर्थी तिथि शब्द आणि प्रतिपदादि तिथि वेदांत कोठे आढळत नाहीत. तथापि पूर्णिमा आणि अमावास्या यांस पंचदशी ही संज्ञा आली आहे. चंद्रमा वै पंचदशः । एष हि पंचदश्यामपक्षीयते ॥ पंचदश्यामापूर्यते ॥ तै. बा. १. ५.१०. " पंचदशीला चंद्र क्षीण होतो. पंचदशीला पूर्ण होतो.” पंचदशी झणजे १५ वी ही संज्ञा ज्या अर्थी आली आहे त्या अर्थी पहिली, दुसरी, झणजे प्रतिपदा, द्वितीया. या संज्ञाही प्रचारांत असतील असे दिसते. त्या प्रथमतः रात्रीच्या वाचक असून मागाहून तिथीच्या वाचक झाल्या असाव्या. सामविधानबाह्मणांत रूष्णचतुर्दशी, कृष्णपंचमी, शुक्लचतुर्दशी हे शब्द आले आहेत ( २, ६,२,८; ३, ३). अमावास्या आणि पूर्णिमा यांखेरीज त्यांसारखा अष्टका हा एक शब्द वेदांत आहे. अष्टका. पुढील वाक्ये पहा. द्वादश पौर्णमास्यः ॥ द्वादशाष्टकाः ॥ द्वादशामावास्याः ॥ तै. बा. १. ५. १२. शतपथ ब्राह्मणांतही याच अर्थाचें एक वाक्य आहे (६. ४. २. १०). यावरून संवत्सरांत १२ पौर्णमासी आणि १२ अमावास्या असतात तशा अष्टकाही