पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हा मंत्र पुरुषमेधांतला आहे. यांत संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर, इद्वत्सर, वत्सर यांस अमुक अमुक स्त्रिया द्यावयाच्या असे सांगितले आहे. वाजसनेयिसंहितेंतील या दोन्ही मंत्रांत नांवांचा क्रम एकच आहे. दुसन्या मंत्रांत संवत्सरादि पांच नांवे येऊन पुनः संवत्सर हे एक आले आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत पुढील वाक्ये आहेत. अग्निर्वाव संवत्सरः । आदित्यः परिवत्सरः । चंद्रमा इदावत्सरः॥ वायुरनु वत्सरः । ते.बा. १.४.१०. अग्नि हाच संवत्सर होय, आदित्य परिवत्सर, चंद्रमा इदावत्सर, वायु अनुवत्सर. यांत चारच नांवें आहेत. त्यांतील पहिली तीन वाजसनेयिसंहितेतील क्रमानेच असून चवथें त्यांतल्याहून निराळंच अनुवत्सर हे आहे. संवत्सराय पर्यारिणी । परिवत्सरायाविजातां । इदावत्सरायापस्कद्दरी ॥ इद्वत्सरायातीत्वरीं । वत्सराय विजर्जरां । संवत्सराय पलिकीं ॥ ते. बा. ३. ४.१. याच वाक्यासारखे वाजसनेयिसंहितेतील वाक्य वर दिले आहे. दोहोंतील संवत्सरांच्या नांवांचा क्रम एकच आहे. मध्य पशूत मात्र थोडा फरक आहे. यांतही पांच नांवें झाल्यावर शेवटीं पुनः संवत्सर शब्द आला आहे. संवत्सरोसि परिवत्सरोसि ॥ इदावत्सरोसीवत्सरोसि ॥ इद्वत्सराोस वत्सरोसि ॥ तै. बा. ३.१०.४. यासारखेंच वाजसनेयिसंहितले एक वाक्य वर दिले आहे. परंतु त्यांतल्यापेक्षा यांत चवथ्या ठिकाणी इदुवत्सर हे एक जास्तच नांव आहे. म्हणजे एकंदर सहा आहेत. यांत इदुवत्सर म्हणजे अनुवत्सर असें माधवाचार्य म्हणतात. याखेरीजही तैत्तिरीय आणि वाजसनेय वेदांत संवत्सर, परिवत्सर, इत्यादि नांवें बरेच ठिकाणी आली आहेत. यांत कोठे पांच, कोठे सहा व कोठे चारच नांवें आली आहेत; व ती नांवेंही कांहीं निरनिराळ्या प्रकाराने आहेत. तेव्हां वेदांगज्योतिषांतलें जें पंचसंवत्सरात्मक युग त्याच्याच प्रचरितत्वाची दर्शक ही नांवें आहेत की कसें हें निश्चयाने सांगवत नाही. तथापि वेदोत्तरकालीन पुष्कळ ग्रंथांत पंचसंवत्सरात्मक युग आणि त्याचे अवयवीभूत संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर, अनुवत्सर, इद्वत्सर, असे पांच संवत्सर, यांचा निर्देश पुष्कळ ठिकाणी आला आहे, त्यास पूर्वपरंपरेचा कांहीं तरी आधार असला पाहिजे. सारांश सर्वाशी वेदांगज्योतिषांतील पंचसंवत्सरात्मक युगपद्धतीसारखी नसली तरी काही अंशी तशी पद्धति वैदिककाली प्रचारांत असावी असे दिसते. आतां वर्ष आणि तदंगभूत मास यांविषयी विचार करूं. वर्ष शब्दाचा सांप्रत जो अर्थ आपण समजतो त्याअर्थी, मणजे ३५४ दिवस वर्ष. किंवा ३६५ दिवस किंवा असा काही तरी काल याचा वासहा रात्र चक, असा “ वर्ष " शब्द ऋग्यजुःसंहिता आणि ऐतरेय - व गोपथ ब्राह्मण यांत आला नाही. शतपथ ब्राह्मणांत (२.२.३) आला * मूलात ऋतु ऋग्वेदांत शरद् इत्यादिऋतुवाचक शब्द पुष्कळ वेळा आले आहेत. त