पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२३) ईन्यिद्वपुषे वपुश्शक्रं रथस्य ये मधुः ॥ पर्यन्या नाहषा युगा मन्हारजांसि दीयथः ।। क. सं. ५. ७३.३. अर्थ-[हे अश्वींनो ] मानवयुगांत तुह्मी आपल्या रथाच्या दुसऱ्या चकानें..। भुवनांभोवती फिरतां. दीर्घतमा मामतेयो जुजुर्वान् दशमे युगे ।। अपामर्थ यतीनां ब्रह्मा भवति सारथिः॥ क्र. सं. १. १५८. ६. अर्थ-ममतेचा पुत्र दीर्घतमा दहाव्या युगीं वृद्ध होत्साता परिणामाप्रत जाणाया कर्माचा कात्विग्रूप सारथि झाला आहे. या वरील भाष्यांत सायण ह्मणतात की अश्वींच्या प्रभावेंकरून दीर्घतमा दहा युगेंपर्यत अत्यंत सुखी होत्साता कालक्रमण करून पुढे वृद्ध झाला. युग शब्दानें काय घ्यावयाचे हे ते स्पष्ट लिहित नाहीत. तरी त्यांच्या लेखाच्या पूर्वापर संदर्भावरून कृतादि दहा युगे घ्यावयाची असा त्यांचा अभिप्राय दिसतो. युगे युगे विदध्यं गणद्भ्योग्नेरथिं यशसं धेहि नव्यसीं ॥ . ऋ. सं. ६. ८.५. अर्थ-हे अग्ने, युगा युगाचे ठायीं यज्ञार्थ तुजला उद्देशून नवी स्तुति करणाऱ्या आह्मांला द्रव्य आणि यश दे. या ओषधीः पूर्वा जाता देवेभ्यस्त्रियुगं पुरा ।। क्र.सं. १०..९७.१. अर्थ-ज्या ओषधि पूर्वी तीन युगांमध्ये देवांपासून झाल्या. या वरील भाष्यांत सायणाचार्य “ त्रियुगं" या शब्दाचा अर्थ "रुतताका या तीन युगांमध्ये " किंवा "वसंतवर्षाशरद् या तीन ऋतूंमध्ये " असा कर तैत्तिरीय संहितेतही हा मंत्र या जाता ओषधयो देवेभ्यस्त्रियुगं पुरा॥ असा आला आहे. वाजसनेयि संहितेत देखील ( १२.७५ ) हा मंत्र या ओषधीः पूर्वा जाता देवेभ्यस्त्रियं पुरा । असा आला आहे. त्याच्या अर्थात भाष्यकार महीधर यांणी त्रियुग शब्दा संत, वर्षा, शरद् हे ऋतु घेतले आहेत. वाजसनेयि संहितेंत युगनिर्देश पुढीलप्रमाणे आहे. श्रुत्कर्ण ६० सप्रथस्तमं त्वागिरा दैव्यं मानुषा युगा ।। वा. सं. १२. १११. या सर्व वाक्यांत युग शब्द काही तरी कालाचा वाचक आहे याविषय संशय नाही. आतां तो काल मणजे अमुकच वर्षे असे कोणत्याही वा स्पष्ट होत नाही. वेदांगज्योतिषांत पांच वर्षांचें एक युग मानले आहे वरील वाक्यांत आहे असें खात्रीने ह्मणतां येत नाहीं; तथापि तो अर्थ नाहीं ह्मणतां येणार नाही. कारण वेदांगज्योतिषांतील युगाचे अंगभूत जे पांच कोणत्याही वाक्यावरून निले आहे. तोच अर्थ तो अर्थ नाही असेंही भत जे पांच संवत्सर