पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स वा एष न कदाचनास्तमोत नोदेति तं यदस्तमेतीति मन्यतेन्ह एव पृथ्वीचें गोलत्व आ तदंतमित्वाथात्मानं विपर्यस्यते रात्रीमेवावस्तात् कुरुतेहः परस्तादथ णि निराधारत्व. यदेनं प्रातरुदेतीति मन्यते रावेरेव तदंतमित्वाथात्मानं विपर्यस्यतेऽहरेदिवस रात्र. वावस्तात् कुरुते रात्री परस्तात् स वा एष न कदाचन निनोचति ।। ऐ. ब्रा. १४. ६. अर्थ – तो हा (सूर्य) कधीच अस्त पावत नाहीं, उदय पावत नाही. अस्त पावतो असें जें मानतात तें ( वस्तुतः काय आहे ह्मणाल तर)दिवसाच्या अंतास जाऊन स्वतःस उलट फिरवितो. अलिकडे रात्र करितो आणि पलीकडे दिवस [करितो]. तसेच हा प्रातःकाळी उगवतो असें में मानतात तें [वस्तुतः असें आहे की तो रात्रीचा अंत करून स्वतःस उलट फिरवितो. अलिकडे दिवस करितो, पलीकडे रात्र [करितो]. [वस्तुतः] हा [सूर्य] कधीच अस्त पावत नाही.* पृथ्वी गोलाकार आहे, ती आकाशापासून अलग आहे, आणि आकाशांत निराधार राहिलेली आहे, या गोष्टीचे ज्ञान वरील ब्राह्मणवाक्यांत स्पष्ट आहे. अथर्ववेदाच्या गोपथ ब्राह्मणांतही (९.१०) याच अर्थाची बहुतेक अशीच वाक्ये आली आहेत. पृथ्वीचा आकार गोल आहे आणि ती निराधार आहे ही गोष्ट ऋग्वेदसंहिताकालींही माहित होती असे दिसून येते. खालील दोन ऋचा पहा. चक्राणासः परीणहं पृथिव्या हिरण्येन मणिना शंभमानाः ॥ न हिन्वानासस्तिातरुस्त इंद्रं परिस्पशो अदधात्सूर्यण ॥ क्र. सं.१.३३.८. अर्थ-सुवर्णमय अलंकारांनी शोभायमान असे ते [वृत्राचे] दूत पृथ्वीच्या परिघासभोंवतीं घिरट्या घालीत असतां आणि आवेशानें धांवत असतांही, इंद्राला जिंकावयास समर्थ झाले नाहीत. [मग तो त्या] दूतांस सूर्याने (प्रकाशाच्या योगाने) आच्छादिता झाला. पृथ्वी जर सपाट असेल तर सूर्य उगवण्याबरोबर त्याचे किरण सर्व पृथ्वीवर, निदान तिच्या अर्ध्या भागावर एकदम पडतील. परंतु ते तसे न पडतां एकामागून एक पडत जातात असे निर्देश बन्याच ठिकाणी आहेत. खालील ऋचा पहा. आप्रा रजांसि दिव्यानि पार्थिवा श्लोकं देवः कृणुते स्वाय धर्मणे ।। प्रबाहू अखाकू सविता सवीमनि निवेशयन् प्रसुवनलभिजगत् ॥ क्र. सं. ४. ५३. ३. अर्थ-देदीप्यमान [सविता] अंतरिक्षांतील द्युलोकांतील [आणि] पृथ्वीवरील प्रदेश [तेजानें] भरून टाकिता झाला आहे..... आपल्या कांतीने जगताला निज

  • बोलणारा स्वतःच्या स्थलास अनुलक्षून बोलत आहे. आलिकडे झणजे बोलणारा सूर्याच्या ज्या बाजूस आहे तिकडे. स्वतःस उलट फिरवितो, ह्मणजे सायंकाळपर्यंत सरळ जाउन अस्तानंतर खाली उलट वळतो.

+ वेदार्थयत्नकार रा. रा. शंकर पांडुरंग पंडित हे या ऋचेच्या व्याख्यानांत (वेदार्थयत्न, पु. १ पृ. ३८०) ह्मणतातः-ह्यांत ' परीणहं चक्राणास: ' असे शब्द आहेत, त्यांवरून ज्या वेळीं हैं सूक्त रचिलें त्या वेळी पृथ्वीची आकृति सपाट नाहीं, वर्तुळ (गोल) आहे, असे ज्ञान आपल्या आर्यपूर्वजांस होते असे स्पष्ट दिसून येते.