पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहे. आणि तो युलोकाएवढा मोठा होण्यासारखा आहे. परंतु त्याचे वर्णन करणान्या मनुष्यांचे आयुष्य फारच थोडे आणि ही पृथ्वी लहानच. जर पृथ्वी मोठी होईल आणि तिजवरील मनुष्ये दीर्घकाल वांचतील तर इंद्राचा प्रभाव अतिशय वर्णिला जाईल, आणि अनंतविश्वभर पसरेल. ह्यांतून आपणांस एवढेच पहावयाचें कीं हें विश्व पृथ्वीहून अनंतपट मोठे आहे हे या ऋचेत स्पष्ट आहे. विश्व अनंत आहे असें वर्णन दुस-याही पुष्कळ ठिकाणी आहे. उदाहरणार्थ, तैत्तिरीय ब्राह्मणांतील वर लिहिलेला अनुवाक ( ३.११.१.) पहा. सकल भवनांस आ सकल भुवनें सूर्याच्या आधारावर आहेत याविषयी पुधार सूर्य. ढील वाक्ये पहा. . सप्त यजति रथमेकचक्रमको अश्वो वहति सप्तनाम ॥ त्रिनाभि चक्रमजरमनर्वं यत्रेमा विश्वा भुवनाधितस्थुः ।। क. सं. १. १६४. २. अर्थ-त्या एक चाकी रथाला सात [ घोडे ] जोडतात. [परंतु ] सात नांवांचा एकच घोडा [ रथ ] ओढितो. त्या चकाला तीन नाभि आहेत; तें अक्षय आणि अप्रतिबंध आहे. आणि त्याच्या आधारावर सर्व भुवनें राहिली आहेत. या ऋत सूर्य हा शब्द नाहीं तरी ती मूर्याविषयींच आहे याविषयी संशय नाही. सनेमि चक्रमजरं विवावृत उत्तानायां दशयुक्ता वहति ॥ सूर्यस्य चक्षू रजसैत्यावृतं तस्मिन्नार्पिता भुवनानि विश्वा ।। क्र. सं. १. १६४. १४. अर्थ-नित्य ज्याला एकच मार्ग आहे [आणि ] में अविनाशी आहे तें चक्र फिरतच असते.....सूर्याचें जें चक्षु तें...फिरत आहे. त्याजवर सकल भुवनें स्थापिलेली आहेत. मित्रो जनान् यातयति प्रजानन् मित्रो दाधार पृथिवीमुत यां ॥ मित्रः कृष्टी रनिमिषाभिचष्टे... तै. सं. ३. ४. ११. अर्थ-मित्र [ज्याची त्याची योग्यता जाणून ] जनास प्रेरणा करितो. मित्र युलोक आणि पृथ्वी यांचें धारण करितो. मित्र हा मनुष्ये आणि देव यांस पाहतो. ऋग्वेदांत देखील थोड्याशा फेरफाराने ही ऋचा आली आहे. याप्रमाणे आणखीही पुष्कळ वाक्ये दाखविता येतील. ऋतूंस कारण सूर्य. ऋतूंना कारण सूर्यच आहे, याविषयी पुढील ऋचा पहा. पूर्वामनु प्रदिशं पार्थिवानामृतून प्रशासद्विदधावनुष्टु ।। क. सं. १. ९५. ३. अर्थ-[ तो सूर्य ] ऋतूंचे नियमन करून पृथ्वीच्या पूर्वादि दिशा एकामागून एक निर्माण करितो. ऋतूंची उत्पत्ति सूर्यापासून आहे याविषयीं दुसरी अनेक वाक्ये दाखविता