पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६९) सांप्रत पैठणाच्या पूर्वेस सुमारे ७० मैलांवर गोदेच्या उत्तरतीराजवळच पाथरी म्हणून गांव आहे, तेच हे पार्थपुर होय. हे देवगिरि (दौलताबाद) च्या आग्नेयीस सुमारे ८५ मैल आहे. विदर्भा नदीलाच मंगला असे दुसरें नांव असावें. तिच्या आणि गोदेच्या संगमाच्या वायव्येस एक कोशावर पार्थपुर आहे असें वरील वर्णनावरून होतें. कमलाकर देवज्ञाने या पाथरीचे वर्णन केले आहे (पुढें विष्णूचे वर्णन पहा), त्यांत ती विदर्भ देशांत आहे, ती राजांची नगरी आहे, देवगिरीपासून १६ योजनें आग्नेयीस आहे, असे तो म्हणतो. योजनाचे ५ मैल धरून १६ योजनें ठीकच आहेत. या काळच्या काही इतर ग्रंथांतही पाथरीच्या प्रदेशाला विदर्भ देश मटले आहे. ज्ञानराजाने सिद्धांतसुंदर ग्रंथांत क्षेपक इत्यादि दिले आहेत, ते शक १४२५ या वर्षीचे आहेत. यावरून तो त्याचा काल होय. दर पिकाल. ढीस सुमारे ३० वर्षे धरून वरील वंशवृक्षांतला पहिला पुरुष राम याचा काल सुमारें शक १२१५ येतो. तो देवगिरीचा राजा राम याच्या कालाशी जुळतो. ज्ञानराजाने सिद्धांतसुंदर या नांवाचा ज्योतिषसिद्धांत केला आहे. सिद्धांतसुंदर याचे गोलाध्याय आणि गणिताध्याय हे मुख्य दोन भाग माझ्या पाहण्यांत आले (आनंदाश्रमपुस्तकांक ४३५०). त्यांत गोलाध्यायांत भुवनकोश, मध्यगतिहेतु, छेद्यक, मंडलवर्णन, यंत्रमाला, ऋतुवर्णन, असे ६ आधिकार आहेत. त्यांत यथाक्रम ७९, ३०, २१, १६, ४४, ३४ श्लोक आहेत. गणिताध्यायांत मध्यम, स्पष्ट, त्रिप्रश्न, पर्वसंभूति, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, ग्रहास्तोदय, नक्षत्रछायादि, शृंगोन्नति, ग्रहयोग, महापात, असे ११ आधिकार आहेत. त्यांत अनुक्रमें ८९, ४८, ४३,७,४०,१६, १९, २०, १८, १०, ११ श्लोक आहेत. सुंदरसिद्धांतावर ज्ञानराजाचा पुत्र चिंतामणि याची टीका आहे. तींतल्या एका स्थलींच्या उल्लेखावरून दिसते की, सुंदरसिद्धांतांत बीजगणितही आहे. परंतु ते माझ्या पाहण्यांत नाही. तें भास्करीय बीजछायानुरूप आहे; त्यांत "सरूपके वर्णकती तु यत्र" या भास्करीय सूत्राचे खंडन केलें आहे, असें सुधाकर द्विवेदी यांणी लिहिले आहे.* सिद्धांतसुंदर हा ग्रंथ वर्तमानसूर्यसिद्धांतानुसारी आहे. यांत ग्रहगणिताकारतां करणग्रंथाप्रमाणे क्षेपक आणि वर्षगति दिल्या आहेत. क्षेपक शक १४२५ चे आहेत. ते कोणत्या वेळचे आहेत हे सांगितले नाही. परंतु मी गणित करून पाहिले त्यावरून ते त्या वर्षी अश्विन शुद्ध ८ गुरुवार सूर्योदयापासून गतपटी ५६ पळे ३९ या वेळचे आहेत असे सिद्ध झाले. ते आणि ग्रह वर्षगति सर्वांशी वर्तमानसूर्यसिद्धांतानुसार आहेत. क्षेपक आडनिड वेळचे आहेत असें सकद्दर्शनी दिसते. परंतु त्यांत मध्यम रवि ६।०।१४।१७ आहे; ह्मणजे तो मध्यमतुलासंक्रमणानंतर बरोबर १५

  • काशी येथील संस्कृत पाठशाळेतील गणिताध्यापक सुधाकर द्विवेदी यांणी 'गणकतरंगिणी नांवाचें संस्कृत पुस्तक शके १८१४ मध्ये केले आहे. ते छापले आहे. त्याचे पृष्ठ ५६ पहा. या पुस्तकांत गणकांचा इतिहास आहे.