पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२७०) वटिकांचा आहे. यावरून मध्यमतुलासंक्रमणानंतर १५ घटिकांचे क्षेपक देण्याचा हेतु दिसतो. मध्यमाधिकारांत ग्रहांस एक बीजसंस्कार सांगितला आहे. तो असाः खाभ्रखाभ्राष्टभू १८०००० भिर्गतं यत्कलेस्तष्टमेतस्य यातैष्ययोरल्पकं ॥ तवा १ पावकैः ३ सिद्ध २४ संख्यैर्हतं दृग्यमै : २२ खाग्निभिः ३० खांककै ९० र्वन्हिभिः ६ ॥ ८३ ॥ नंद ९ निवायुतेना १०००० तभागैर्युताः सूर्यसौरावनीजा: परे वर्जिताः ॥ दृक्समत्वं ग्रहाणामनेन स्फुटं प्राह दामोदराचार्य एवं बुधः । ८४ ॥ वर्तमानसूर्यसिद्धांतांतला एक बीजसंस्कार मागें (पृ. १८५) सांगितला आहे, त्याच्या ३० पट हा संस्कार आहे. बाकी सर्वांशी तो आणि हा एकच आहेत. पृ. १८५ यांतील अंकांप्रमाणे शक १३२१ मध्ये सूर्यास फक्त ६ विकला संस्कार येतो. हा अत्यल्प आहे. ज्ञानराजाने सांगितलेला दामोदरोक्त संस्कार वरील वर्षी सूर्यास ३ कला येतो. हाच संभवनीय दिसतो. सूर्यसिद्धांतांत बीजोपनयनाध्यायाच्या ७ व्या श्लोकांत 'भागादि' या स्थली राश्यादि' असा पाठ केला तर तेथील संस्कार दामोदरोक्ताशी अगदी मिळतो. 'भागादि' हा पाठ लेखकप्रमाद असावा असे दिसते. आणि सूर्यसिद्धांतांत सांगितलेला ( पृ. १८५) संस्कार दामोदरोक्तच असावा असें अनुमान होते. दामोदरोक्त रविसंस्काराचें वर्षमान +4 विकला येते. याच्या योगानें सौरवर्षमान विपलादि २।२६।६ कमी होते. ह्मणजे सूर्यसिद्धांतोक्त वर्ष ३६५।१५।३१।३१।२४ आहे, ते ३६५।१५।३१।२८।५७५४ होते. शक १३३९ च्या सुमारास झालेल्या दामोदराचे वर्णन मागे केले आहे (पृ. २५५) तोच हा दामोदर असावा. ज्ञानराजाने आपल्या वेळचे अयनांश कोठे सांगितलेले आढळले नाहीत. मध्यान्हछायेवरून काढलेला रवि आणि करणागत स्पष्ट रवि यांचें जें अंतर तें अयनांश इतकेंच सांगितले आहे. अयनगति वर्षास एक कला सांगितली आहे. अयनांश काढण्याची सूर्यसिद्धांतांतली रीतिही सांगितली आहे. तिजवरून वर्षगति ५४ विकला येते. चंद्रशृंगोन्नत्यधिकारांत चंद्रकलावृद्धिक्षयाविषयीं श्रुतिपुराणमत सांगून ज्ञानराज ह्मणतोः वेदे सुराः सूर्यकराः प्रसिद्धास्त एव यच्छंति कलाः क्रमेण ॥ सितेऽसिते ते क्रमशो हरंति ॥ ६५ ॥ अर्थ-वेदांत सूर्यकिरण हेच देव प्रसिद्ध आहेत. तेच क्रमाने शुक्लकृष्णपक्षांत चंद्राच्या ] कला देतात आणि हरितात. संदरसिद्धांतांत वेधसिद्ध नवीन नाही. तथापि कांहीं कांहीं उपपत्निप्रकार भाकासिद्धांताहून विशेष आहेत. यंत्रमालाधिकारांत एक यंत्र नवीन सांगितले आहे. कंदरीत पाहतां सिद्धांतसुंदर आपल्या नावाप्रमाणे आहे असें ह्मणण्यास हरकत नाही. ज्ञानराजाने सुंदर सिद्धांताखेरीज आणखी जातक, साहित्य, आणि संगीत यांवर एकेक ग्रंथ केला आहे, असे सूर्याने भास्करीय बीआणखी ग्रंथ. जभाष्यांत लिहिले आहे.