पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६७ ) केशव आणि गणेश यांच्या वंशांत आणखीही विद्वान् पुरुष बरेच झाले असें दिवंशज. सतें. गणेशाचा धाकटा बंधु अनंत याचो वराहमिहिररूत लघुजातकावर शक १४५६ जयनामसंवत्सरी लिहिलेली टीका आहे. ती उत्पलकत टीकेहून लघुतर आणि सुगम आहे असें अनंतानें झटले आहे. वडील बंधु गणेश, याजपाशींच अनंतानें अध्ययन केलं होतं. गणेशाचा पुतण्या नृसिंह याची ग्रहलाघवावर टीका होती असें विश्वनाथी टीकेवरून दिसते. परंतु ती मला कोठे उपलब्ध झाली नाही. गणेशाचा पुत्र बल्लाळ, त्याचा पुत्र केशव, त्याचा पुत्र गणेश याणे सिद्धांतशिरोमणीवर शिरोमणिप्रकाश या नांवाची टीका केलेली आहे. ती सुमारे शक १५२० ची असावी. पुढला याच वंशांतला रुद्राचा पुत्र केशव याणे लमकलाप्रदीप या नांवाचा ग्रंथ शक १६२९ सर्वजित् संवत्सरी केलेला आहे. कल्पद्रमकरण. करणकुतूहल ग्रंथावरील शक १४८२ च्या एका टीकेंत या करणाचा उल्लेख आला आहे. त्या टीकेवरून दिसते की रामचंद्र नांवाच्या कोणा ज्योतिष्याने कल्पद्रुमकर न केले व त्याणे करणकुतूहल ग्रंथास बीजसंस्कार सांगितला आहे. पुढे सांगितलेल्या दिनकर आणि श्रीनाथ ह्यांच्या ग्रंथांतले रामबीजाचे अंक आणि ह्या टीकाकाराने दिलेले अंक भिन्न आहेत. यावरून दिनकर आणि श्रीनाथ यांच्या ग्रंथांतलें रामबीज निराळे असावें. लक्ष्मीदास, शक १४२२. भास्करीय सिद्धांतशिरोमणीचा गणिताध्याय आणि गोलाध्याय यांवर याची गणिततत्त्वचिंतामणि या नांवाची टीका आहे. तिची ग्रंथसंख्या ८५०० आहे. तींत उपपत्ति आणि उदाहरण आहे. याचे गोत्र उपमन्यू, पित्याचें नांव वाचस्पातीमश्र आणि पितामहाचें नांव केशव होते. मुख्य उदाहरणांत वर्तमानकालीन शक १४२२ असें त्याणे झटले आहे. ग्रहणाचे उदाहरण कलिगत ४५९९ (शक १४२०) या वर्षीचे आहे. टीका करण्यास प्रवृत्त होण्याचे कारण त्याणे असें सांगितले आहे: शिरोमणिविवोधने सुजननागनाथरितः सहृद्गुण गणाकरप्रगुणदेवनाथार्थितः ।। हितैरनघराघवैरपि निजानुजोर्वीधर प्रियप्रतिविधैषयास्मिविविधप्रयत्नोन्मुखः ।। लक्ष्मीदास हा चांगला कवि होता असे दिसते. ज्ञानराज. शक १४२५. ज्यांतील विद्वत्परंपरा अद्यापि चालत आहे अशा एका प्रसिद्ध विद्वत्कुलांत ज्ञानराज झाला. सांप्रत मोंगलाईतील बीड एथे राहणारे काशिनाथ शास्त्री नामक