पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६६) कल विद्यविषयी कमी झाला, नवीन शोध करण्याविषयी इतर अनेक कारणांनी लोकांची प्रवृत्तिच नाहीशी झाली, याबद्दल दोष गणेश दैवज्ञास देणे योग्य नाही. ग्रहलाघवावर टापरग्रामस्थ गंगाधर याची शक १५०८ ची टीका आहे. मल्लारि टीका. दैवज्ञाची टीका १५२४ साली झालेली आहे. तीत उपपत्ति आहे. विश्वनाथी टीका शके १५३४ च्या सुमाराची आहे. तीत उदाहरणे आहेत. त्या टीकेला उदाहरण असेंही ह्मणतात. ह्यांतील शेवटच्या दोन टीका छापल्या आहेत. बृहच्चितामणीची कोष्टके फार असल्यामुळे त्यांवरून फारसें कोणी गणित करीत नाहीत. लघुचिंतामणीवरून करितात. हा ग्रंथ छापला आहे. त्यांत अंकच फार आहेत. त्यांत परंपरेनें चुका होता होतां हल्ली फार झाल्या आहेत. मी त्या सारण्या बहुतेक शुद्ध केल्या आहेत. बृहञ्चितामणीवर विष्णु देवज्ञाची सुबोधिनी नांवाची टीका आहे. तीत उपपत्ति आहे. लघुचिंतामणीवर " चिंतामणिकांति ” ह्मणून टीका यज्ञेश्वर नामक ज्योतिष्याने केली आहे. तींत उपपत्ति आहे. मुहूर्ततत्व आणि विवाहवृंदावन यांवरील टीका छापल्या आहेत. तर्जनीयंत्र हे कालसाधनार्थ आहे. त्याला प्रतोदयंत्र असेंही ह्मणतात. त्यावर सखारामकत एक टीका आहे. दुसरी संगमेश्वर एथील राहणारा गोपिनाथ याची टीका आहे. गोपीनाथाच्या पित्याचें नांव भैरव आणि पितामहाचें राम असे होते. या ग्रंथाविषयी जास्त विवेचन यंत्रप्रकरणांत येईल. ताजकभूषणनामक ग्रंथाचा कर्ता गणेश आणि जातकालंकार ग्रंथाचा कर्ता गणेश असे दुसरे दोन गणेश आहेत ते ग्रहलाघवकाराहून निराळे. ग्रहलाघवकाराविषयीं एक दंतकथा सांगून त्याचे वर्णन पुरे करं. त्याचा पिता दंतकथा. केशव याने एकदा एक ग्रहण वर्तविलें. ते बरोबर मिळाले नाही यामुळे तेथील राजा कोणी यवन होता, त्याने त्याचा किंचित् उपहास केला. केशवास वाईट वाटले ह्मणून त्याने नंदिग्राम येथे गणपतीचें एक देवालय होतें त्यांत बसून तपश्चर्या आरंभिली. त्या वेळी तो वृद्ध झाला होता. ती त्याची दशा व निष्ठा पाहून गणपतीने स्वप्नांत त्यास दृष्टांत दिला की आतां तुझ्या हातून ग्रह शोधण्याचे काम व्हावयाचे नाही. मीच तुझ्या पोटी अवतार घेऊन तें करीन. त्याप्रमाणे त्याला पुत्र झाला त्याचे नांव गणेश ठेविलें. गणेश हा ईश्वरी अवतार असें सांप्रत ज्योतिषी समजतात. याविषयीं दुसऱ्या दोन दंतकथा वर सांगितल्याच आहेत. ह्या सर्व गोष्टी त्याविषयी लोकांची पूज्यबुद्धि दाखवितात. अशा बुद्धिमान् पुरुषास ईश्वरी अंश मानूं लागलें झणजे तेणेकरून आपल्या हातून त्यासारखें कांहीं व्हावयाचेंच नाही अशी दृढ बुद्धि होऊन जाते. आणि आमच्या देशांत नवीन शोधाच्या अभावास हीच गोष्ट पुष्कळ अंशी कारण आहे.