पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६५) आणि तो शके १४०० मधील आहे, तरी गणेश दैवज्ञाने कदाचित् मुळीच पाहिला. ही नसेल. तेव्हां तिथिचिंतामणीसारखा गणितास अत्यंत उपयोगी आणि अत्यल्पश्रमद ग्रंथ करण्याचे यश ग्रहलाघवकारास स्वतंत्रपणे देण्यास हरकत नाही. केरो लक्ष्मण छत्रे यांनी गणेश दैवज्ञास असा दोष दिला आहे की, "त्यांनी सोप्या युक्ति दोषारोप. बसवून गणित सुलभ केलें.. परंतु ... त्या मानानें तें स्थूल होऊन... पुढील चुकीचा पाया पडला. दुसरा परिणाम...सिद्धांतज्योतिष शिकण्याचा व वेध करण्याचा प्रचार नाहीसा होऊन शास्त्राच्या मलसिद्धांतांचें ज्ञान ज्योतिष्यांस नाहींसें झालें.*" दुसरेही कोणी ग्रहलाघवकारास असाच दोष देतात. परंतु गणेश दैवज्ञासंबंधे विचार करितांना आधुनिक युरोपियन ग्रंथांशी तुलना करून त्याच्या स्थूलतेस दोष देऊन उपयोग नाही. त्याच्या वेळी जी साधने उपलब्ध होती त्यांवरून काय करितां येण्याजोगें होते हे पाहिले पाहिजे. पूर्वीच्या करणग्रंथकारांनी गणेशापेक्षां जास्त मूक्ष्मता साधली आहे की काय आणि वेधासंबंधे गणेशाने काय शोध केले आहेत इत्यादि विचार करण्याची साधने आजपर्यंत फारशी नव्हती यामुळे केरोपंत नानांनी किंवा इतर दोष देणारांनी हा विचार आजपर्यंत कधीं केला आहे असे मला वाटत नाही. तो केला असतां गणेश दैवज्ञास दोष देण्यास मुळीच जागा नाही. अतिश्रमाने सिद्धांतावरून गणित करून जे फळ येणार ते थोड्या श्रमाने मिळेल तर कां घेऊ नये? आणि गणितग्रंथांत अशी सुकरता आणण्यांत कोणत्याही गोष्टींत सूक्ष्मतेंत स्वपूर्वज्योतिष्यांहून गणेश कमी नाही असे म्हणण्यास हरकत नाही. गणेश दैवज्ञापासून चकीचा पाया पडला हे केरोपंतांचे म्हणणे चुकीचे आहे, असे सर्व सिद्धांतकरणग्रंथांचा परस्परसंबंध एथवर मी दाखवीत आलों आहे त्यावरून दिसून येईल.वर्षमान चुकीचे असे म्हणणे असेल तर तें प्रथमपासूनच चुकीचे आहे. कल्पकता आणि क्रियावत्ता हे दोन्ही गुण ज्यांमध्ये आहेत असे ज्योतिषी गणेशापूर्वी फारच थोडे झाले असे मला वाटते. वेधाच्या कामी तर भास्कराचार्यापेक्षा तो निःसंशय श्रेष्ठ होय. सांप्रत ज्योतिषसिद्धांतग्रंथांचे अध्ययन बहतेक बुडाल्यासारखेच आहे. ग्रहलाघव संपूर्ण पढलेले असेही जोशी थोडे सांपडतात; मग सिद्धांताची वार्ता कशास पाहिजे ? परंतु हा दोष गणेशाच्या ग्रंथाचा नव्हे. त्याच्या मागाहून ज्योतिःसिद्धांतरहस्य जाणणारे, स्वतः सिद्धांतग्रंथ करणारे व वेध घेणारे पुष्कळ ज्योतिषी झाले आहेत असें पुढील इतिहासावरून दिसून येईल. स्वतः त्याने सिद्धांतशिरोमणीवर व लीलावतीवर टीका केली आहे. उपपत्तीविषयीं ग्रंथ लिहावा तर ते काम भास्कराचार्याने केलेलेच होतें. युरोपांत जे नवीन शोध सुमारे याच्याच वेळापासून सुरू झाले. नशांकडे याची प्रवृत्ति झाली नाही हे खरे; परंतु या देशांत एकंदर लोकसमुदायाचाच

  • केरोकृत ग्रहसाधनाची कोष्टके, प्रस्तावना पृ. २.