पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रहलाघांत मध्यमाधिकार, स्पष्टाधिकार, पंचताराधिकार, त्रिप्रश्न, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, मासगणग्रहण, स्थूल ग्रहणसाधन, उदयास्त, छाया, नक्षत्रछाया, शृंगोन्नति, ग्रहयुति, महापात, असे १४ अधिकार आहेत. त्यांत अनुक्रमें १६, १०, १७,२६, १३, १३, १९,८,२५, ६, १२,४,४, १४ पये निरनिराळ्या वृत्तांची आहेत. एकंदर पयें १८७ आहेत. सांप्रत ह्या ग्रंथाचे हे १४ अधिकारच प्रसिद्ध आहेत. परंतु विश्वनाथ आणि मल्लारि यांच्या टीकांत पंचांगग्रहणाधिकार ह्मणून १५ श्लोकांचा पंधरावा अधिकार आहे. ग्रहणाबद्दल १४ मध्ये ४ अधिकार असल्यामुळे आणखी अधिकाराचे कारण नाहीं; ह्मणून सांप्रत तो बुडाला असावा. गणित सोपें करण्याच्या कलामुळे कोठे कोठे गणेशाने सूक्ष्मत्वाकडे मुद्वाम दुर्लक्ष्य केलेले दिसते. आणि त्यामुळे १४ अधिकारांत चंद्रसूर्यग्रहणांबद्दल २ अधिकार असतां आणखी २ (७ वा व ८ वा) दिले आहेत. परंतु त्यांचे वस्तुतः कांहीं प्रयोजन नाही. ग्रहलाघवांत इतरत्रही कमजास्त झालेले आढळते. बार्शी एथे शके १६०५ मध्ये लिहिलेलें ग्रहलाघव पुस्तक मला आढळले, त्यांत १५वा अधिकार मुळीच नाहीं; पंचताराधिकारांत ३ श्लोक जास्त आहेत; त्यांत ग्रहोदयास्ताविषयी काही आहे; ते श्लोक विश्वनाथी टीकेंत नाहीत. कांहीं श्लोकांत पाठभेद आहेत; विश्वनाथी टीकेंत कांहीं श्लोक असून ते कृष्णशास्त्री गोडबोले यांणी छापलेल्या ग्रहलाघवांत नाहीत. चंद्राचा सूक्ष्मशर काढण्याचा एक श्लोक विश्वनाथी टीकेंत व कृष्णशास्त्री यांच्या पुस्तकांत आहे, परंतु तो वरील बार्शी प्रतीत नाही. निरनिराळ्या पुस्तकांत कांहीं श्लोकांचा अनुक्रम निराळा आढळतो. नक्षत्रछायाधिकारांत सांप्रत एक श्लोक आढळतो, परंतु तो गणेश दैवज्ञाचा पुतण्या नृसिंह याचा आहे असें विश्वनाथ ह्मणतो. बार्शी प्रतींत तो नाही. असो. असा कमजास्तपणा आढळतो, तरी यामुळे मूळ ग्रंथकाराच्या पद्धतीस कोठे विरोध आलेला नाही. गणेशाचे दुसरे ग्रंथ पंचांगोपयोगी असे बृहच्चितामाण आणि लघुचिंतामणि हे इतर ग्रंथ. म होत. त्यांवरून तिथिनक्षत्रयोग फार लवकर करितां येतात. प्रत्यक्ष ग्रहलाघवावरून स्पष्ट रविचंद्र करून तिथ्यादि करणे तर सतत बसूनही त्या कामास ६ महिने लागतील. मध्यमस्पष्ट रविचंद्र करण्यास सारण्या केलेल्या आहेत. त्यांचा उपयोग केला तर वर्षाचे तिथिनक्षत्रयोग करण्यास सतत बसून सुमारे २४ दिवस लागतील असा माझा अजमास आहे. परंतु लघुचिंतामणीवरून इतकें त्वरित काम होतें कीं, तिथिनक्षत्रयोग मी ३ दिवसांत केले आहेत. बृहचिंतामणीवरून याहून थोड्या वेळांत काम होईल. असे असून तिथिचिंतामणीवरून आणलेली घटीपळे आणि प्रत्यक्ष ग्रहलाघवावरून आणलेली घटीपळे यांत सुमारे ३० पळांहून जास्त अंतर पडत नाही, असें मी ताडून पाहिले आहे. तिथिचिंतामणीचे *स्वरूप विस्तरभयास्तव एथे सांगत नाही. अशा प्रकारचा ग्रंथ गणेश दैवज्ञापूर्वीचा कोणाचा आढळत नाही. मकरंद ग्रंथ पूर्वी सांगितला (पृ. २५७)त्यावरून त्वरित गणित होते; परंतु त्याची पद्धति कांहीं निराळी आहे.

  • केरोपंतानी आपल्या ग्र० सा० कोष्टकांत प्रथम तिथिसाधन गणेश दैवज्ञाच्या तिथिचिंतामणीच्या रीतीनेच केले आहे. त्यांत टपपनि दिली नाही. परंतु त्या रीतींतील प्रत्येक गोष्टीची उपपत्ति व एक उदाहरण असें एप्रिल १८८७ च्या इंडिअन आंटिक्वरी पुस्तकांत एका निबंधांत मी दिले आहे.