पान:प्राचीन मिस्त्रीलोकांचे वृत्तांत कथन.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५९) ब्राझार्यभटसौरायेष्वाप ग्रहकरणेषु बुधशक्रयोर्महदंतरं अंकतया दृश्यते । मंदे आकाशे नक्षवग्रयोगे उदयेऽस्ते च पंचभागा अधिकाः प्रत्यक्षमंतरं दृश्यते । ... एवं क्षेपेष्वंतरं वर्षभोगेष्वपि. अंतरमस्ति । एवं बहुकाले बव्हतर भविष्यात । यतो ब्राह्मायेष्वपि भगणानां सावनादीनां च बहतर दृश्यते एवं बहुकाले बहूतरं भवत्येव । ... एवं बहतरं भविष्येः सुगणकैः नक्षत्रयोगग्रहयोगोदयास्तादिभिवर्तमानघटनामवलोक्य न्यूनाधिकभगणाद्यैर्ग्रहगणितानि कार्याणि । यद्वा तत्कालक्षेपकवर्ष भोगान् प्रकल्प्य लघुकरणानि कार्याणि । ... एवं मया परमफलस्थाने चंद्रग्रहणतिथ्यताद्विलोमविधिना मध्यचंद्रो ज्ञातः तत्रफल-हासवृध्यभावात् । केंद्रगोलादिस्थाने ग्रहणतिथ्यताद्विलोमविधिना चंद्रोचमाकलितं । तत्र फलस्य परमन्हासवृद्धित्वात् । तत्र चंद्रः सूर्यपक्षात्पंचकलोनो दृष्टः । ठयं ब्रह्मपक्षाधितं । सूर्यः सर्वपक्षेपीषदेतरः स सौरो गृहीतः । अन्ये ग्रहा नक्षत्रग्रहयोगग्रहयोगास्तोदयादिभिर्वर्तमानघटनामवलोक्य साधिताः । तत्रेदानीं भौमेज्यौ ब्राह्मपक्षाश्रितौ घटतः । ब्राह्मो बुधः । ब्राम्हार्यमध्ये शुक्रः । शनिः पक्षवयात्पंचभागाधिको दृष्टः । एवं वर्तमानघटनामवलोक्य लघुकर्मणा ग्रहगणितं कृतं ॥ याप्रमाणे आपण घेतलेल्या वेधांची हकीकत दुसऱ्या कोणत्याही ज्योतिष्याने लिहिलेली मला कोणत्याही ग्रंथांत आढळली नाही. किंबहुना मूलसूर्यसिद्धांतकार, पहिला आर्यभट, ब्रह्मगुप्त, आणि भाजाचे वेळचे ज्योतिषी यांखेरीज केशवासारखा दुसरा ज्योतिषी झालाच नाही असे मला वाटते. ह्याने केलेले वेध कोणत्या दिवशी केले व वेधानें ग्रह कसे आले इत्यादि हकीकत वरच्याप्रमाणे लिहिलेली असती, तर तिचा उपयोग फारच झाला असता. परंतु तशी हकीकत ग्रंथांत लिहून ठेविण्याची आमच्या देशांतील ज्योतिष्यांची पूर्वपरंपराच नाही, ही मोठी शोचनीय गोष्ट आहे. ह्याच्या अनुभवास जसे ग्रह आले तदनुसार क्षेपक आणि वर्षगति ह्याने ग्रहकौतुकांत दिल्या आहेत, असे त्या ग्रंथावरून गणित केल्यावरून मला दिसून आले. ग्रहकौतुक आणि जातकपद्धति यांवर स्वतः केशवाची टीका आहे. गणेश दैवज्ञ. हा मोठा नामांकित ज्योतिषी होऊन गेला. सांप्रत सर्व भरतखंडांत याचे ग्रहगणितग्रंथ जितक्या प्रदेशांत प्रवृत्तींत आहेत तितके दुसरे कोणाचे नाहीत. ह्याच्या पित्याचें नांव केशव, आईचे नांव लक्ष्मी, गोत्र कौशिक, वसतिस्थान पश्चिम समुद्रतीरींचें नांदगांव, इत्यादि वृत्तांत पूर्वी आलाच आहे. ह्याच्या ग्रहलाघवावरील विश्वनाथी टिकेंत विश्वनाथ ह्मणतो, "श्रीमद्गुरुणा गणेशदैवज्ञेन ये ग्रंथाः कृतास्ते तद्भातपत्रेण नृसिंहज्योतिर्विदा स्वरूतग्रहलापवटीकायां श्लोकद्वयेन निबद्धाः ते यथाः कृत्वादौ ग्रहलाघवं लघुबहत्तिथ्यादिचिंतामणी ।। ससिद्धांतशिरोमणौ च विवृति लीलावतीव्याकृति ॥ श्रीवृंदावनटीकिकां च विवृति मौहूर्ततत्वस्य वै। सत्श्राद्धादिविनिर्णयं विवाति छंदोर्णवाख्यस्य वै ॥ १॥ सुधीरंजनं तर्जनीयंत्रकं च सकृष्णाष्टमीनिर्णयं होलिकाया लघूपायपातस्तथान्याः ........." यावरून ग्रहलाघव, लघुतिथिचिंतामणि, बृहत्तिथिचिंतामणि, सिद्धांतशिरोमणिटीका, लीलावतीटीका, विवाहवृंदावनटीका, मुहूर्ततत्त्वटीका, श्राद्धनिर्णय, छंदोवटीका, तर्जनीयंत्र, कृष्णाष्टमीनिर्णय, होलिकानिर्णय, लघूपायपात (पात ग्रंथ.